---Advertisement---

Semi Final: विराटच्या शतकानंतर अनुष्काने दिली फ्लाईंग किस, एकटक बघत राहिला अभिनेता रणबीर- पाहा व्हिडिओ

Ranbir Kapoor Anushka Sharma
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. भारताने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत केले आणि अंतिम सामन्यात धडक दिली. अनुष्का शर्मा हिच्यासाठी बुधवारचा (15 नोव्हेंबर) दिवस खास ठरला. कारण तिचा पती आणि भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने कारकिर्दीतील 50वा शतक केला. विराटच्या शतकानंतर वानखेडे स्टेडियमच्या स्टॅन्डमधील एक पोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा उपांत्य सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकांच्या या सामन्यात भारतीय संघ 4 विकेट्सच्या नुकसानावर 397 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ मात्र 48.5 षटकांमध्ये 327 धावांमध्ये सर्वबाद झाला. मोहम्मद शमी 7 विकेट्स घेत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सोबतच विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची शतकी खेळीही संघासाठी महत्वाची ठरली.

विराटने या सामन्यात 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. विराटने 106 चेंडूत आपले शतक पूर्ण केल्यानंतर अनुष्का शर्मा स्टॅन्डमध्ये जल्लोष करताना दिसली. अनुष्काने स्टॅन्डमधून विराटला प्रोत्साहन देण्यासाटी फ्लाईंग कीस देखील दिले. विराटच्या शतकी खेळीसोबतच सोशल मीडियावर अनुष्का शर्मा देखील चांगलीच व्हायरल झाली. पण अनेकांचे लक्ष वेधले रनबीर कपुर याने. विश्वचषकाच्या या उपांत्या सामन्यात रनबीर कपुर आपल्या ‘ऍनिमल’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्टेडियममध्ये आला होता. विराटचे शतक झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या अनुष्काकडे रनबीर पाहत असल्याचे व्हायरल फोटोमध्ये दिसते.

रनबीर आणि अनुष्का जवळचे मित्र आहेत. त्यांनी ‘ए दिल हे मुश्किल’ सिनेमात सोबत काम केले आहे. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मुंबईत असल्यामुळे बॉलिवूडमधील अनेक मोठे चेहरे स्टेडियममध्ये दिसले. यात जॉन अब्राहम, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मलहोत्रा, शाहिद कपुर आणि माधुरी दीक्षित यांचा समावेश होता. (Ranbir Kapoor adoring his bestie Anushka celebrate her husband Kohli’s century from nearby stand)

महत्वाच्या बातम्या – 
विराटचे कौतुक करताना सर विव रिचर्ड्स यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, “तू दुसऱ्या ग्रहावरून…”
Semi Final 2: दक्षिण आफ्रिकेसाठी मिलरची एकाकी झुंज! ऑस्ट्रेलियासमोर फायनलसाठी 213 धावांचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---