वनडे विश्वचषक 2023चा अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 70 धावांनी जिंकला. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. तत्पूर्वी या सामन्याविषयी महत्वाची बातमी समोर येत आहे.
बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने न्यूझीलंड संघाला 70 धावांनी मात दिली. विश्वचषक स्पर्धेचा हा पहिला उपांत्य सामना होता. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (16 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला. भारताने आफ्रिकी संघाला पराभूत करून अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले.
दरम्यान, माध्यमांतील वृत्तांनुसार विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने आस एयर शो आयोजित केला गेला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित या ऐतिहासिक सामन्याला आठवणीत ठेवण्यासाठी सामन्याच्या आधी मैदानाच्या आकाशात एयर शो पाहायला मिळेल. तसेच स्पर्धेची सांगता करण्यासाठी खास कार्यक्रम देखील आयोजित केला जाईल. वृत्तांनुसार गुरुवारी (16 नोव्हेंबर) नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आसपास भारतीय वायुसेनेच्या विमानांचा सराव आयोजित केला गेला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सामन्यासाठी मैदानात उपस्थित राहणार, असेही सांगितले जात आहे.
दरम्यान, भारतीय संघाचे या विश्वचषक हंगामातील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले आहे. भारताने स्पर्धेतील सलग 9 सामने जिंकले असून अद्याप संघ अजिंक्य राहिला आहे. अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळणारा संघ हे आव्हान पेलणार की, पराभव स्वीकारणार, हे पाहण्यासारखे असेल. यावर्षी भारताकडे इतिहासातील तिसरा वनडे विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. कर्णधार रोहित शर्मा याचा अनुभव अंतिम सामन्यात संघाच्या कितपत कामी येतो, आणि संघातील खेळाडू कसे प्रदर्शन करतात, यावर संघाचा विजय आणि पराभव अवलंबून असेल. (Indian Air Force will perform an air show ahead of the World Cup final 2023)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: World Cup Final ला पंतप्रधान मोदी लावणार हजेरी, पाहणार संपूर्ण सामना
विराटचे कौतुक करताना सर विव रिचर्ड्स यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, “तू दुसऱ्या ग्रहावरून…”