हेंडिग्ले, लीड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघ इंग्लंडने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. यामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत यजमान संघाने न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला आहे. या क्लिन स्वीपनंतर आयसीसी २०२१-२३च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत.
कसोटी चॅम्पियन न्यूझीलंड आयसीसी २०२१-२३च्या कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लड विरुद्धची कसोटी मालिका गमावल्यावर न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरला आहे. याबरोबरच त्यांच्या पुढील वर्षी होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याच्या संधी संपुष्टात आल्या आहेत. या स्पर्धेत त्यांनी ४ मालिका खेळल्या असून त्यातील दोनच सामने जिंकले तर ६ सामने गमावले आहेत. यातील एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत इंग्लंड ही मालिका जिंकल्यावर सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे. इंग्लंडने एकूण चार सामने जिंकले आहेत. पहिल्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा उपविजेता भारतीय संघ यंदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी ४ मालिकेतील ६ सामने जिंकले असून ३ सामने गमावले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला ३ गुणांचा फटका बसला आहे. त्यांना १ जुलैला इंग्लंड विरुद्ध होणारा सामना जिंकणे आवश्यक आहे.
बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचे घरच्या मैदानावरील वर्चस्व पुन्हा एकदा दिसले आहे. स्टोक्सची कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांची सगळ्या विभागातील लय पाहता भारतीय संघाला कसोटी सामना जिंकणे अवघड वाटत आहे.
या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर असून त्यांनी दोन मालिकेतील पाचही सामने जिंकत ७२ गुण मिळवले आहेत. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका संघ आहे. त्यांनी तीन कसोटी मालिकेतील ५ सामने जिंकत ६० गुण मिळवले आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तानचा संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IREvsIND: ‘पंड्या एँड कंपनी’ मालिका जिंकणार की पाऊस करेल खेळ खराब? वाचा सविस्तर
‘म्हणून गांगुलीप्रमाणेच ९९ नंबरची जर्सी घातली’, स्वत: खेळाडूनेच दिले स्पष्टीकरण