---Advertisement---

‘म्हणून गांगुलीप्रमाणेच ९९ नंबरची जर्सी घातली’, स्वत: खेळाडूनेच दिले स्पष्टीकरण

On: सोमवार, जून 27, 2022 11:38 PM
Sourav-Ganguly-Jersey
---Advertisement---

विदर्भ आणि पंजाब किंग्जसाठी खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने त्याच्या ९९ क्रमांकाच्या जर्सीविषयी महत्वाची माहिती दिली आहे. आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात जितेशने त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर चांगलाच प्रभाव पाडला. माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली देखील ९९ क्रमांकाची जर्सी घालायचे. जितेशने स्वतःला गांगुलीचा मोठा फॅन सांगतिले आहे. तसेच त्याच्या वडिलांना देखील गांगुली खूप आवडायचे, असेही तो म्हणाला.

जितेशने त्याच्या आयुष्यात गांगुलींना जास्त काळ खेळताना पाहिले नाहीये, पण त्याच्या वडिलांकडून त्याला गांगुलींविषयी खूप माहिती मिळाली. एका कार्यक्रमात बोलताना जितेश शर्मा (Jitesh Sharma) म्हणाला की, “लहानपणापासूनच मी सौरव गांगुलीचा खूप मोठा चाहता राहिलो आहे. मी त्यांना खेळताना जास्त पाहिले नाहीये, पण माझे वडील त्यांच्याविषयी खूप बोलायचे. ते म्हणायचे की, दादा टायगर आहे. तो असा व्यक्ती आहे, ज्याने भारतीय क्रिकेट आणि त्याच दृष्टीकोण बदलून टाकला आहे.”

गांगुली विरोधी संघाचा खेळाडूंना स्वतःवर वर्चस्व करू देत नसायचे. जितेशमध्येही गांगुलींचा हाच गुण आहे. तो म्हणाला की, “त्याव्यतिरिक्त मला त्यांचा आक्रामक अंदाज आवडतो. जेव्हा प्रत्येकजण शांत असायचा आणि भारतीय संघाला विदेशी मैदानात वर्चस्व करता येत नव्हते, तेव्हा ते संघासाठी लढणारे पहिले व्यक्ती होते. मला वाटते माझा स्वभाव त्यांच्याशी खूप मिळता जुळता आहे. जेव्हा कधी कोणी माझ्यावर वर्चस्व बनवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मला ते आवडत नाही. मी नेहमी माझ्या संघासाठी खेळतो आणि इच्छा असते की, आम्ही सामना जिंकावा. त्यामुळे मी ९९ क्रमांकाची जर्सी घालण्याचा निर्णय घेतला.”

दरम्यान, सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. गांगुली २००० साली सर्वप्रथम भारतीय संघाचे कर्णधार बनले होते. कर्णधार बनल्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेटला एक ऊर्जा देण्याचे काम केले होते. त्यांच्या नेतृत्वात संघाने काही ऐतिहासिक मालिका जिंकल्या. २००२ साली श्रीलंकेत आयोजित केल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत गांगुलींच्याच नेतृत्वात विजेता संघ ठरला होता.

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात जितेशने पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व केले. हंगामातील १२ सामन्यांमध्ये जितेश शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने १६३.६४ च्या स्ट्राईक रेटने २३४ धावा केल्या. यष्टीरक्षकाच्या भूमिकेतही त्याचे प्रदर्शन महत्वाचे राहिले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! भारत विरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा अंतिम संघ ठरला, बघा नावे

IRE vs IND | थंडीत बोट काम करत नाहीत पण माइंडसेट करतो, युझवेंद्र चहलचे मोठे विधान

VIDEO। जो रुटवर पडला प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमचा प्रभाव, अतरंगी शॉट मारत सर्वांना केल अचंबित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---