आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी२० सामना रविवारी (२६ जून) डबलिनमध्ये खेळला गेला. दोन सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला. तसे पाहिले तर आयर्लंडमधील वातावरण नेहमीच भारतापेक्षा थंड असते, पण सामन्याच्या आधी त्याठिकाणी पाऊस पडल्यामुळे वातावरण खूपच थंड झाले होते. अशात खेळाडूंना ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्याविषयी युझवेंद्र चहलने माहिती दिली.
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात सामनावीर ठरला. चहलने टाकलेल्या ३ षटकांमध्ये ११ धावा खर्च केल्या आणि १ विकेटही घेतली. पाऊस पडल्यानंतर डबलिनमध्ये थंडी एवढी वाढली होती की, चहलला तीन-तीन स्वेटर घालून खेळावे लागले. चहलने सामना संपल्यानंतर दीपक हुड्डा (Deepak Hooda) सोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान चहल म्हणाला की, इथे खूप थंडी आहे, त्यामुळे बोटं फिरत नाहीयेत. अशात मी स्वतःच्या लेंथमध्ये बदल केला.
चहल पुढे बोलताना म्हणाला की, आमचा प्रयत्न हाच होता की, जर आम्ही धावा दिल्या नाहीत, तर संघासाठी चांगलेच होईल. फिरकी गोलंदाजांनी आयर्लंडच्या थंड वातावरणात गोलंदाजी कशी करायची ? याविषयी देखील चहलने माहिती दिली. तो म्हणाला की, याठिकाणी तुमचा माइंडसेट गोष्टी ठरवत असतो, कारण बोटे इथे काम करत नाहीत. थंडी जास्त असल्यामुळे असे होते. व्हिडिओच्या शेवटीच चहल म्हणाला की, पुढचा सामना २८ जूनला आहे. देवाकडे प्रार्थना करा की एवढी थंडी नसावी.
दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या या टी२० सामन्याचा विचार केला, तर पावसामुळे सामन्याची नाणेफेक उशिरा झाली. नाणेफेक जिंकून भारताने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, पण पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यामुळे सामना सुरू व्हायरला खूपच उशीर झाला. नंतर जेव्ह पाऊस थांबला, तेव्हा दोन्ही संघांना प्रत्येकी १२-१२ षटके देण्याचे ठरले. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने १२ षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुसकानावर १०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ९.२ षटकात आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO। जो रुटवर पडला प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमचा प्रभाव, अतरंगी शॉट मारत सर्वांना केल अचंबित
रोहितच्या अनुपस्थितीत ‘हा’ खेळाडू चांगले नेतृत्व करेल, पाकिस्तानी दिग्गज म्हणतोय बुमराह-पंत नको
INDvsSL | अट्टापट्टूच्या वादळी खेळीच्या जोरावर श्रीलंकेचा विजयी शेवट, ७ विकेट्सने जिंकली तिसरी टी२०






