गुरुवारी (६ जानेवारी) दक्षिण अफ्रिका संघाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील (sa vs ind test series) पहिला सामना जिंकला. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामातील दक्षिण अफ्रिकेची ही पहिलीच कसोटी मालिका आहे आणि हा पहिलाच विजय ठरला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ मधील दक्षिण अफ्रिकेचा हा पहिला विजय ठरला आहे. या विजयानंतर अजिंक्यपद स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने १२ गुण मिळवले आहेत आणि गुणतालिकेत पाचवे स्थान गाठले आहे. दक्षिण अफ्रिकेने अजिंक्यपद स्पर्थेच्या चालू हंगामात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि त्यापैकी एक जिंकला आहे.
भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामात यापूर्वी दोन मालिका खेळल्या आणि संघ ही तिसरी मालिका खेळत आहे. भारताने चालू हंगामात खेळलेल्या ८ कसोटी सामन्यांपैकी चार जिंकले आहेत. दोन सामन्यांमध्ये संघाला पराभव स्वीकारावा लागला, तर दोन सामने अनिर्णीत राहिले. भारतीय संघाचा एक सामना रद्द करण्यात आला होता. गुणतालिकेत भारतीय संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे आणि संघाकडे सर्वाधिक ५३ गुण आहेत.
ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकेल आहेत आणि त्यांच्या संघ गुणतालिकेत पहिल्या कर्मांकावर आहे. ऑस्ट्रेलियाला स्पर्धेच्या चालू हंगामात एकही पराभव मिळाला नाही आणि त्यांच्याकडे ३६ गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे, ज्यांनी खेळलेले दोन्ही कसोटी सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने चालू हंगामातील चार पैकी तीन सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे बांगलादेश आणि वेस्ट इंडीज संघ आहेत. या दोन्ही संघांकडे समान गुण आहेत, परंतु, बांगलादेशची जिंकण्याची सरासरी जास्त असल्यामुळे त्यांचा संघ आघाडीवर आहे. न्यूझीलंडने अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामात तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि एकामध्येही विजय मिळवला नाहीय. तीन पैकी दोन सामन्यात न्यूझीलंड संघ पराभूत झाला, तर एक सामना अनिर्णीत राहिला. गुणतालिकेच्या तळाला आहे इंग्लंड. इंग्लंडने अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सातपैकी पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करला. राहिलेल्या दोन सामन्यांपैकी एकामध्ये विजय मिळवला, तर दुसरा अनिर्णीत राहिला. इंग्लंडची जिंकण्याची सरासरी ७.१४ आहे, जी खूपच खराब मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी मोठा वाद! अव्वल मानांकित जोकोविचला विमानतळावरच रोखले
PHOTO: क्विंटन डी काॅक बनला बाप माणूस, नवजात परीचा नावासह शेअर केलाय फोटो
“त्या दिवसापासून फलंदाज म्हणून शार्दुलमध्ये झाला बदल”; माजी प्रशिक्षकाने सांगितली कहानी
व्हिडिओ पाहा –