भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा १६ जून पासून सुरू होत आहे. यामध्ये त्यांना एकमात्र कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. तत्पुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आईसीसी) मंगळवारी (०१ जून) महिला टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय युवा फलंदाज शेफाली वर्मा हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच कैथरीन ब्रायर्स या स्कॉटलंड महिला क्रिकेटपटूने पहिल्यांदाच पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे.
शेफालीच्या नावावर ७७६ गुण आहेत. तिच्यानंतर ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी (७४४ गुण) दुसऱ्या आणि मेग लेन्निंग (७०९ गुण) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय महिला टी-२० संघाची उपकर्णधार स्म्रिती मंधाना चौथ्या स्थानावर आहे. तसेच जेमिमा रोड्रिगेज नवव्या स्थानावर आहे. एकंदरीत या क्रमवारीत तीन भारतीय महिलांनी टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे.
या क्रमवारीचे मुख्य आकर्षण स्कॉटलंडची अष्टपैलू कॅथरीन ब्रिस ही आहे. तिने अष्टपैलूंच्या क्रमवारीत तब्बल १० स्थानांची प्रगती करत तिसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहे. ती आयर्लंडविरुद्धच्या ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारी स्कॉटलंडची फलंदाज राहिली आहे. परंतु तिच्या संघाला या मालिकेत १-३ ने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
गोलंदाजी टी-२० क्रमवारीत पहिल्या १० मध्ये दोन भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे. भारतीय गोलंदाज दिप्ती शर्मा सहाव्या स्थानावर तर राधा यादव सातव्या स्थानावर आहे. दिप्तीचे गुण ७०५ आहेत तर राधाचे ७०२ आहेत. गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर इंग्लंडची महिला खेळाडू सोफी एक्लेस्टोन ही आहे.
Scotland skipper @Kathryn_Bryce shines in this week's @MRFWorldwide ICC Women's T20I Player Rankings update ✨
⭐️ No.10 in batting rankings
⭐️ No.3 in all-rounder rankingsFull list: https://t.co/py2wQA3VZq pic.twitter.com/Ey5LunE894
— ICC (@ICC) June 1, 2021
सात वर्षांनंतर भारतीय महिला संघ खेळणार कसोटी सामना
भारतीय महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. ब्रिस्टोल येथे १६ ते १९ जून दरम्यान हा कसोटी सामना होईल. यापूर्वी भारतीय महिला संघाने नोव्हेंबर २०१४ साली शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनंतर भारतीय महिला संघ कसोटी सामना खेळताना दिसेल.
त्यानंतर तीन वनडे सामने २७ जून, ३० जून आणि ३ जुलै रोजी खेळवले जातील. यानंतर टी२० मालिका ९ जुलैपासून सुरू होईल आणि ही मालिका १४ जुलैपर्यंत चालणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जगावेगळंच नाही का! पाकिस्तानचा कर्णधार आपल्याच बहिणीशी बांधणार लगीनगाठ
‘ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर किंग खानसोबत बेभान होऊन नाचलो’, केकेआरच्या माजी खेळाडूचा खुलासा
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमारची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ गोलंदाज