विश्व कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना शुक्रवारपासून (18 जून) साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. परंतु सामन्याच्या आधीच पावसाला सुरुवात झालेली आहे. यामुळे सर्वच क्रिकेटच्या चाहते नाराज झालेले आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका देखील आहेत. सामना सुरू होण्याअगोदरच अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. एका फोटोद्वारे तिने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या, तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने नाराजी व्यक्त केली आहे.
अनुष्काने भारतीय संघाचा ग्रूप फोटो शेअर करत लिहिले की, “हे लोक.” या पोस्टमध्ये तिने विराटला टॅग केलेले आहे, तर दुसरा पोस्टमध्ये तिने लिहिले की, “पाऊस… पाऊस… दूर जा! 5 दिवसानंतर परत ये.” कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने बायो बबलमध्ये खेळले जाणार आहेत. अशातच भारतीय संघातील अनेक खेळाडूंचे कुटुंब त्यांच्यासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेले आहे.
आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव म्हणून ठेवला आहे. कारण पावसामुळे सामन्याचा वेळ वाया जाऊ शकतो. त्यामुळे त्याचा निर्णय दिला जाऊ शकत नाही. या राखीव दिवसावर सामना खेळण्यासाठी संघाला मैदानावर उतरावं लागेल.
https://twitter.com/rajunewone/status/1405785498006605828
भारतीय संघाने सामन्याच्या एक दिवश अगोदरच संघात खेळणाऱ्या अकरा खेळाडूंची घोषणा केली आहे. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह.
महत्वाच्या बातम्या-
युजवेंद्र चहलच्या पत्नीने केला ‘विरुष्का’सोबतचा फोटो शेअर; अनुष्काबद्दल बोलताना म्हणाली, ‘ती खूप…’
जेव्हा अव्वल गोलंदाज राशिदने खाल्ला होता सपाटून मार, इंग्लंडच्या फलंदाजांनी ठोकले होते ११ षटकार
धोनीने तुझी कारकिर्द संपुष्टात आणली? चाहत्याच्या प्रश्नावर सेहवागने दिले होते ‘असे’ उत्तर