पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) चे अध्यक्ष एहसान मनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला लक्ष्य केले असून यामध्ये जगातील तीन सर्वात मोठ्या क्रिकेट मंडळाचा समावेश आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्यासह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने आयसीसीच्या ‘बिग थ्री’ फॉर्म्युल्यामुळे खूप नुकसान केले असल्याचे मनीने म्हटले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि आयसीसीचे चेअरमन असलेले मणी यांनी असाही आरोप केला आहे की, या तिन्ही देशांनी जागतिक क्रिकेटचेही बरेच नुकसान केले आहे.
२००३ ते २००६ या काळात आयसीसीचे अध्यक्ष असलेले एहसान मनी यांचं म्हणणं आहे की, ‘बिग थ्री’ हा फॉर्म्युला आयसीसीच्या इतर सर्व सदस्यांना लागू केला गेला होता. आयसीसीच्या महसूल वाटपाच्या मुद्द्यावर ज्या देशांचे एकमत झाले नाही. अशा मोठ्या देशांनी त्या छोट्या देशांशी न खेळण्याची धमकीही दिली होती. असा आरोपही त्यांनी केला आहे. परंतु मनी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळाचेही कौतुक करतात.
मनी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, “मी अत्यंत भाग्यवान होतो की माझ्या काळात आयसीसीमध्ये सर्व सदस्यांचे एक संघटित बोर्ड होते. परंतु बिग थ्रीने हे संतुलन संपुष्टात आणले. म्हणून त्याला बिग थ्री म्हटले गेले.”
पुढे ते म्हणाले, “भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकत्र येऊन जी गोष्ट इतरांच्या हिताची नव्हती तीही लागू केली. बिग थ्रीच्या बदलाशी जे सहमत नाहीत, त्याच्या बरोबर न खेळण्याची धमकीही दिली गेली होती. आता सर्वजण स्वत: च्या हितासाठी ओरडत आहेत,” असंही ते म्हणाले.
भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर पुढे आरोप करीत मणी म्हणाले, बिग थ्री फॉर्म्युला क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपाच्या फायद्याचा नव्हता. यामुळे जागतिक क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी ग्लोबल डेव्हलपमेंट फंड आणि आयसीसीच्या सहयोगी सदस्य देशाकडून पैसे हिसकावले आहेत. ही गोष्ट पूर्णपणे अवांछनीय होती. आयसीसीच्या सर्व प्रमुख टूर्नामेंट्स भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांमध्ये विभागल्या गेल्या, असाही त्यांनी आरोप केला आहे.
माजी गोलंदाज एहसान मनी यांनी नुकताच आयसीसी अध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या शशांक मनोहर यांचे कौतुक केले आहे. २०१४ मध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी शशांक मनोहर बीसीसीआय अध्यक्ष होते. मनी त्यांच्याबद्दल पुढे म्हणाले की, “शशांक मनोहरने हे नुकसान रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु अजून बरेच काही करणे बाकी आहे. आणि हे फक्त आयसीसीच्या नियमित आढाव्याद्वारे केले जाऊ शकते, अन्यथा बर्याच देशांची क्रिकेट मंडळे दिवाळखोर होतील.”
मनी म्हणाले आहेत, “मला मनोहरबद्दल खूप आदर आहे. मला वाटते की ते सुपर आहेत. ते खूप चांगले होते. मला असे वाटते की ते निर्णय घेणारे होते.”
आयसीसीचे अध्यक्ष म्हणून शशांक मनोहर यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २०१७ मध्ये संपुष्टात आला होता आणि त्यानंतर त्यांना आणखी दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती, परंतु नंतर त्यांनी त्यासाठी नकार दिला आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात मणी यांनी म्हटले आहे की ते आयसीसी अध्यक्ष राहिले असते तर बरे झाले असते.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नई सुपर किंग्जमध्ये रैनाची जागा घेणारा हा खास ‘टेस्ट स्पेशालिस्ट बॅट्समन; शेन वॉटसनचा दावा
-प्रीती झिंटाच्या टीमच्या हाती यंदाही लागणार निराशा; दिग्गजाने केली भविष्यवाणी
-खुशखबर! प्रवीण कुमार, मुनाफ पटेल ‘या’ लीगमधून करणार क्रिकेटमध्ये पुनरागमन
ट्रेंडिंग लेख-
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट
-मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा