बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. 14 डिसेंबरला या सामन्याला सुरूवात झाली असून दुसरा दिवस आर अश्विनने गाजवला. त्याने गोलंदाजी नाहीतर जबरदस्त फलंदाजी केली. त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना कहर केला. त्याने 58 धावा केल्याने तो सगळ्यांच्या कौतुकाचे आकर्षण बनला. यातच त्याच्याबाबत एका क्रिकेट संघाने ट्वीट केले जे चांगलेच व्हायरल झाले आहे.
आर अश्विन (R Ashwin) याने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक केले, जे त्याचे कसोटीतील 13वे अर्धशतक ठरले. त्याचबरोबर त्याने आठव्या विकेटसाठी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्यासोबत 87 धावांची भागीदारीही केली. यामुळे भारताने पहिल्या डावात 400 धावसंख्येचा आकडा पार केला. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे आईसलॅंड क्रिकेटने ट्वीट केले ज्यामध्ये त्यांनी विशेष आकडेवारी सांगितली आहे. यामध्ये त्यांनी अश्विनच्या कामगिरीची तुलना रिचर्ड हॅडली आणि शेन वॉर्न या दिग्गजांशी केली आहे. ज्यामुळे ते ट्वीट खूपच व्हायरल झाले.
बांगलादेशविरुद्ध अश्विनने 113 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने 58 धावा केल्या. ज्यामुळे तो कसोटीमध्ये 3000 धावांचा आकडा पार करण्यापासून केवळ 11 धावाच दूर आहे. त्याचबरोबर त्याने कसोटीत आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 1700 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी केवळ भारताचे दिग्गज कपिल देव यांनाच जमली आहे. त्यांनी 1777 धावा केल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये पाहिले तर न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल विट्टोरी कसोटीत आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 2227 धावा केल्या आहेत.
आईसलॅंड क्रिकेटने ट्वीटमध्ये लिहिले, ‘जेव्हा लोक महान कसोटी अष्टपैलू खेळाडूंची यादी तयार करतात तेव्हा रवी अश्विनचे नाव क्वचितच असते. पण हॅडलीच्या जवळपास सारख्याच सरासरीने त्याने पाच शतकांसह 3,000 धावा केल्या आहेत. वॉर्नपेक्षा कमी सरासरीने जवळपास 450 विकेट्स घेतल्याचा उल्लेख नाही.’
When people compile lists of the greatest Test all-rounders, Ravi Ashwin's name is rarely present. But he has nearly 3,000 runs at almost the same average as Hadlee, with five centuries. Not to mention nearly 450 wickets at a lower average than Warne.
— Iceland Cricket (@icelandcricket) December 15, 2022
आईसलॅंड क्रिकेटच्या ट्वीटबाबत पाहिले तर, त्यांनी अश्विनचे कौतुक करताना त्याला कसोटीतील सर्वोत्कृष्ठ अष्टपैलू म्हटले आहे. यामध्ये त्यांनी अश्विनची फलंदाजीची सरासरी (27.12) ही जवळपास न्यूझीलंडचे दिग्गज हॅडली (27.2) यांच्याइतकीच आहे. अश्विन हॅडलींच्या 136 धावा मागे आहे. तसेच आईसलॅंड क्रिकेटने अश्विनची गोलंदाजी सरासरी (24.20) दिवंगत महान वॉर्न (25.40) पेक्षा कमी आहे. Iceland cricket amazing statistics tweets about Ravichandran Ashwin good batting Compare with Richard Hadlee & Shane Warne, BANvIND Test
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या कुलदीपने बांगलादेशात गाडला झेंडा, ‘ही’ कामगिरी करणारा तो पहिला भारतीय
कसोटीत बांगलादेशविरुद्ध एका डावात पाच विकेट्स घेणारा कुलदीप सातवाच भारतीय, तर पहिला…