भारतीय गोल्फर अदिती अशोक टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत शनिवारी (७ ऑगस्ट) चौथ्या आणि अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर घसरली. शुक्रवारी तिसऱ्या फेरीपर्यंत ती दुसऱ्या स्थानावर कायम होती. यानंतर, अदिती देशासाठी गोल्फ प्रकारात पदक जिंकेल अशी अपेक्षा भारतीयांना लागली होती. असे असले, तरीही ऑलिंपिक इतिहासातील भारतासाठी गोल्फ खेळणारी सर्वाेत्तम खेळाडू ठरली आहे.
अदितीला स्पर्धेत चौथ्या स्थानावर समधान मानावे लागले आहे. स्पर्धेतील तिच्या पदक जिंकण्याच्या हुकलेल्या संधीबाबत प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, “दुसऱ्या कोणत्या स्पर्धा असत्या, तर चौथ्या स्थानावर समाधान मानले असते. मात्र, ही ऑलिंपिक होती. येथे चौथ्या स्थानावर समाधान मानने कठीण आहे. मी चांगला खेळण्याचा 100 टक्के प्रयत्न केला. मला वाटते की, मी अंतिम फेरीत यापेक्षा चांगले प्रदर्शन करू शकत होते.”
#TeamIndia | #Tokyo2020 | #Golf
Women's Individual Stroke Play ResultsFrom 41st in #Rio2016 to 4th Rank and Diploma here @Tokyo2020 What incredible golf from Aditi Ashok in the last 4 days! Congratulations @aditigolf 👏🙌 #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/6LW1mUwY2L
— Team India (@WeAreTeamIndia) August 7, 2021
तिला अपेक्षा आहे की, तिचा खेळ पाहून लोकांचा या खेळातील रस वाढेल. जो खेळ आतापर्यंत उच्च वर्गातील लोकांचा समजला जायचा. ती पुढे बोलताना म्हणाली की, “माझी ईच्छा होती मी सुर्वणपदक जिंकावं. तरीही सर्वजण आनंदी असतील, अशी माझी अपेक्षा आहे. मी अंतिम फेरीच्या आधी जास्त विचार केला नव्हता की, लोकं मला टीव्हीवर पाहत आहेत.”
आदिती म्हणाली, “आणखीन चांगले प्रदर्शन केले, तर लोकांची खेळातील रूची वाढेल. आणखी जास्त मुलं गोल्फ खेळायला लागतील. जेव्हा मी गोल्फ खेळायला सुरूवात केली होती, तेव्हा कधी विचार केला नव्हता की, ऑलिंपिक खेळेल. गोल्फ त्यावेळी ऑलिंपिकचा भाग नव्हता. मेहनत करून आणि खेळाचा पूर्ण आनंद घेऊन तुम्ही सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकता.”
असे असले, तरीही भारतीय गोल्फर अदितीने ऑलिंपिकमध्ये चांगली खेळी केली.
महत्वाच्या बातम्या-
-अभिमानास्पद! अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसराच भारतीय
-इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक