---Advertisement---

आयईएस व्हीएन सुळे गुरुजी संघाच्या विजयात आयुष, रुद्र चमकले!

On: बुधवार, फेब्रुवारी 12, 2020 4:33 PM
---Advertisement---

मुंबई । दादरच्या आयईएस व्हीएन सुळे गुरुजी इंग्लिश संघाने मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत दणदणीत विजयाची नोंद केली. सलामीवीर आयुष म्हात्रे आणि रुद्र सुकाळे यांच्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर व्हीएन सुळे गुरुजी संघाने माझगांवच्या सेंट मेरी आयसीएसई संघावर २४८ धावांनी मोठा विजय मिळवला. आयुष आणि रुद्र यांच्या शतकांच्या जोरावर सुळे गुरुजी संघाने ३९ षटकांत २ बाद ३२० धावा केल्या. प्रत्युत्तरात सेंट मेरी संघाचा डाव ७२ धावांवर गडगडला. ११८ चेंडूंत नाबाद १२० धावा कराणाऱ्या आयुषला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. रुद्रने ११४ धावांची तोडीसतोड खेळी केली.

दुसऱ्या सामन्यात प्रियांश पटेलने गोरेगावच्या विब्ग्योर हायस्कूलचा निम्मा संघ तंबूत पाठवून फातिमा हायस्कूलला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजीला आलेल्या विब्ग्योरचा संपूर्ण संघ १३.४ षटकांत ५० धावांत माघारी परतला. फातिमा हायस्कूल संघाने हे लक्ष्य एक विकेटच्या मोबदल्यात पार केले.

डॉन बॉस्को हायस्कूलच्या विजयात महादेव बल्लाची गोलंदाजी निर्णायक ठरली. त्याने ३ षटकांत दोन निर्धाव षटक टाकले आणि चार धावांत दोन विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक

१४ वर्षांखालील मुले

आयईएस व्हीएन सुळे गुरुजी इंग्लिश स्कूल ( दादर) ३९ षटकांत २ बाद ३२० ( आयुष म्हात्रे १२०*, रुद्रा सुकाळे ११४ ) वि. वि. सेंट मेरी आयसीएसई स्कूल ( माझगांव) २४.४ षटकांत सर्वबाद ७२; २४८ धावांनी विजय; सामनावीर – आयुष म्हात्रे ( ११८ चेंडूंत नाबाद १२० )

डॉन बॉस्को हायस्कूल ( माटुंगा) ६.३ षटकांत २ बाद ५७ ( नमन झावर ३१*, साई नायक १२) वि. वि. सेंट एलॉयसिस हायस्कूल ( नालासोपारा) २१.१ षटकांत सर्वबाद ५६; सामनावीर – महादेव बल्ला ( ३-२-४- २ आणि १ झेल)

फातिमा हायस्कूल ( घाटकोपर) ४.२ षटकांत १ बाद ५१ ( श्लोक खैरे २४*, युग वाघेला ८) वि. वि. विब्ग्योर हायस्कूल आयजीसीएसई ( गोरेगांव) १३.४ षटकांत सर्वबाद ५०; सामनावीर – प्रियांश पटेल ( ५ विकेट्स)

पार्ले टिळक व्ही ई एम एस १२ षटकांत १ बाद ७२ ( रझा मिर्झा ४०* , यशस गनिगा १२*) वि. वि. अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअल ( चेंबूर) २६. ३ षटकांत सर्वबाद ७१ ; सामनावीर – आर्या गवस ( ३ विकेट्स)

रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल ( खार) ७.४ षटकांत बिनबाद ९४ ( अवैस खान ६४*, सिध्दांत राय २२*) वि. वि. माटुंगा प्रीमियर स्कूल ३५.५ षटकांत सर्वबाद ९१; सामनावीर – आर्या कार्ले ( ५३ धावा, माटुंगा प्रीमियर स्कूल)

अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल ( तुर्भे ) १४.५ षटकांत ६ बाद ८० ( रहिम सलीम खान २०, खान नावेद झबिउल्लास १८*) वि. वि. रायन इंटरनॅशनल स्कूल ( सानपाडा) १९.२ षटकांत सर्वबाद ७९ ; सामनावीर – रहिम सलीम खान ( २० धावा आणि ४ विकेट्स)

अंजुमन ए इस्लाम अल्लान इंग्लिश स्कूल ( सीएसएमटी) ३९.१ षटकांत ५ बाद १८३ ( अभिग्यान कुंदू ५३, पृथ्वी गोवई ४८) वि. वि. कांचन हायस्कूल ४० षटकांत ९ बाद १७९; सामनावीर- अभिग्याज कुंदू ( ५३ धावा )

उत्पल संघवी ग्लोबल स्कूल ( जुहू) ३९ षटकांत ४ बाद २७८ ( प्रेम पारेख ६२, क्रिश जैन ५८*) वि. वि. होली क्रॉस हायस्कूल ( कुर्ला) ३४. ४ षटकांत सर्वबाद १८३; सामनावीर- प्रेम पारेख ( ६२ धावा आणि ३ विकेट्स )

१६ वर्षांखालील मुली

सेंट कोलंबा स्कूल ( गामदेवी) पुढे चाल वि. आरआर एज्युकेशन ट्रस्ट हायस्कूल ( मुलुंड)

वसंत विहार हायस्कूल ( ठाणे) २४ षटकांत ८ बाद १२७ ( श्रेया नायर २१, शर्वरी मोरे ८) वि. वि. नॅशनल इंग्लिश स्कूल ( विरार ) २१.१ षटकांत सर्वबाद ९२ धावा; सर्वोत्तम खेळाडू – सानिया ब्रम्हे ( ४ विकेट्स)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---