सध्या भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेला प्रतिभावंत फलंदाज करुण नायरने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. भारतीय संघाकडून त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चमक दाखवता आली नाही. परंतु, तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या क्षमतेची झलक दाखवत तिहेरी शतक झळकावले.
अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनंतर क्रिकेटच्या सर्वात दिर्घ स्वरुपात त्रिशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज बनला. त्याने नुकतेच एका मुलाखतीत आपण क्रिकेटपटू नसतो तर काय असतो याबाबत खुलासा केला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या करुणने एका क्रिडासंकेतस्थळालि दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तू क्रिकेटर नसता तर, काय बनला असता असे विचारले असता तो म्हणाला, ‘माझ्या आईने मला पुन्हा सॉफ्टवेअर अभियंता बनवले असते.’
करुणने नोव्हेंबर २०१६ मध्ये कसोटी पदार्पण केले आणि कारकिर्दीतील तिसर्या कसोटीत त्रिशतक झळकावले. एकाक्षणी तो कसोटी संघाचा नियमित सदस्य बनेल असे वाटत असताना, २०१७ मध्ये केवळ तीन कसोटी सामन्यांनंतर त्याला संघातून वगळण्यात आले. गेली चार वर्षे तो कसोटी क्रिकेट खेळलेला नाही.
करुणने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत ८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात ६ कसोटी आणि २ वनडे सामन्यांचा समावेश आहे. कसोटीत त्याने एकूण ३७४ धावा आणि वनडे सामन्यात ४६ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ८२ प्रथमश्रेणी सामन्यात एकूण ५६३१ धावा बनविताना १४ शतके आणि २६ अर्धशतके ठोकली आहेत.
आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग असला तरी, त्याला अजून या संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
“कोहलीमध्ये दिसते रिचर्ड्स आणि पॉन्टिंगची झलक, असे खेळाडू दशकातून एकदाच भेटतात”
WTC फायनलमधील पराभव पचवून भारतीय क्रिकेटपटू घेतायेत सुट्ट्यांची मजा, पाहा फोटो
सारा तेंडुलकर ‘या’ ९ क्रिकेटपटूंना करते इंस्टाग्रामवर फॉलो; ४ क्रिकेटपटूंच्या पत्नींचाही समावेश