इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर अचानक संघांच्या बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. तसेच एकापाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु २९ मे रोजी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.
परंतु, ऑस्ट्रेलियाचा आणि कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएल स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. यासोबतच आणखी काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या खेळण्यावर साशंकता आहे. जर ऑस्ट्रेलियाच्या टॉप १० खेळाडूंनी आयपीएल स्पर्धा खेळण्यास नकार दिला तर त्यांना तब्बल ४१ कोटींचे नुकसान होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक खेळाडूला केवळ त्यांच्या कराराच्या ५० टक्के मानधन मिळू शकते. हे कोणते खेळाडू आहेत त्याबद्दल जाणून घेऊ.
पॅट कमिन्स : कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याला या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने १५.५० कोटी खर्च करत आपल्या संघात कायम केले आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत एकूण ३७ सामन्यात एकूण ३८ गडी बाद केले आहेत. अशातच जर त्याने आयपीएलचे उर्वरित सामने नाही खेळले तर त्याला फक्त ७.७५ कोटी मिळतील.
ग्लेन मॅक्सवेल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी ग्लेन मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याला १४.२५ कोटी खर्च करत या संघात स्थान देण्यात आले होते. त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ८९ सामने खेळले आहेत.यात त्याला १७२८ धावा करण्यात यश आले आहे. यासोबतच, त्याने १९ गडी देखील बाद केले आहेत. जर त्याने आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने खेळण्यास नकार दिला तर त्याला ७.१२ कोटींचे नुकसान होईल.
झाय रिचर्डसन: ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याला पंजाब किंग्ज संघाने १४ कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याला या हंगामात ३ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यामध्ये त्याने ३ गडी बाद केले होते. जर त्याने आयपीएलचे उर्वरित सामने खेळण्यास नकार दिला तर त्याला ७ कोटी रुपये कमी मिळतील.
डेविड वॉर्नर: सनरायजर्स हैदराबाद संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरला निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. त्याला या संघात १२.५ कोटी खर्च करत संघात कायम करण्यात आले आहे. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण १४८ सामने खेळले आहेत. यात त्याने ५४४७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४ शतक आणि ५० अर्धशतक झळकावले आहेत. जर त्याने उर्वरित आयपीएल २०२१ मधील सामने खेळण्यास नकार दिला तर त्याला ६.२५ कोटींचे नुकसान होऊ शकते.
नॅथन कुल्टर नाईल : आयपीएल २०२० स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा गोलंदाज, नॅथन कुल्टर नाईल याला या हंगामात देखील ५ कोटी खर्च करून संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ३४ सामने खेळले आहेत. यात त्याला ४१ गडी बाद करण्यात यश आले आहे. जर त्याने आयपीएलचे उर्वरित सामने खेळण्यास नकार दिला तर त्याला २.५ कोटींचे नुकसान होऊ शकते.
मार्कस स्टॉयनिस :दिल्ली कॅपीटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस याने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण ५४ सामने खेळले आहेत. यात त्याला ८९६ गडी बाद करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने ३० गडी देखील बाद केले आहेत. त्याने जर ही स्पर्धा खेळण्यास नकार दिला तर त्याला २.४ कोटींचे नुकसान होऊ शकते.
डॅनियल क्रिस्टियन : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणारा अष्टपैलू खेळाडू,डॅनियल क्रिस्टियन याला या हंगामात ४.८ कोटींची बोली लावत संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने जर आयपीएलचे उर्वरित सामने खेळण्यास नकार दिला तर त्याला २.४ कोटी रुपये मिळतील.
हेनरिक्स,रिचर्डसन आणि स्मिथला ही होणार कोटींचे नुकसान
मोझेस हेन्रिक्सला पंजाब किंग्ज संघाने ४.२ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. तर रिचर्डसनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ४ कोटी आणि स्टीव्ह स्मिथला दिल्ली कॅपिटल्स संघाने २.२ कोटी रुपये खर्च करत संघात स्थान दिले होते. त्यामुळे या खेळाडूंना त्यांनी जर आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने खेळण्यास नकार दिला तर अनुक्रमे, २.१कोटी, २ कोटी आणि १.१ कोटी कमी मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात ‘हे’ तीन संघ बदलू शकतात आपले कर्णधार, कारणे घ्या जाणून
तिसऱ्यांदा आयपीएल युएईमध्ये, पाहा तिथे सर्वाधिक धावा करणारे कोण आहेत ५ फलंदाज
WTC Final: इंग्लंड संघासाठी ५० कसोटी सामने खेळलेल्या ‘या’ क्रिकेटरने निवडली भारतीय संघाची प्लेइंग ११