भारतात कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल २०२१ अचानकपणे स्थगित करण्यात आली. उर्वरित आयपीएल खेळवली जाणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर आता स्पष्ट झाले आहे की, आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने युएईमध्ये होणार आहेत.
हा निर्णय शनिवारी (२९ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एसजीएममध्ये घेण्यात आला होता. हे सामने १९ किंवा २० सप्टेंबर पासून सुरू होऊ शकतात. बीसीसीआयने आपल्या वतीने आयपीएल २०२१ पार्ट टूची तयारी सुरू केली आहे. हे लीग पुन्हा एकदा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी हे कोणत्याही परिस्थितीत लीग आयोजित केली जाईल हे स्पष्ट केले आहे. युएईमध्ये ही लीग तिसर्या वेळी होईल.
या तिघांनी ठोकल्या आहेत सर्वाधिक धावा
आतापर्यंत युएईमध्ये आयपीएल दोनदा आयोजन करण्यात आले असून या काळात सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत केएल राहुल पहिल्या क्रमांकावर आहे. केएल राहुलने युएईमध्ये मागील दोन हंगामात ४९ च्या सरासरी आणि १२५ च्या स्ट्राइक रेटने ७८८ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, डेव्हिड वॉर्नर याने ४० च्या सरासरीने एकूण ७११ धावा केल्या तर, त्याचा स्ट्राइक रेट १२९ असा राहिला आहे. शिखर धवनने युएईमध्ये ३७ च्या सरासरीने आणि १४० च्या स्ट्राइक रेटने ७०३ धावा फटकावल्या आहेत.
अशी आहे विराटची आकडेवारी
आयपीएलमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत युएईमध्ये ३८ च्या सरासरीने ५७१ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १२० असून, तो पाचव्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्याने ४२ च्या सरासरीने ५९० धावा केल्या आहेत तर, त्याचा स्ट्राइक रेट १५० आहे.
युएई येथे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे अव्वल ६ फलंदाज –
७८८ धावा – केएल राहुल
७११ धावा – डेव्हिड वॉर्नर
७०३ धावा – शिखर धवन
५९० धावा – सूर्यकुमार यादव
५७१ धावा – विराट कोहली
५६९ धावा – मनीष पांडे
महत्त्वाच्या बातम्या –
WTC Final: इंग्लंड संघासाठी ५० कसोटी सामने खेळलेल्या ‘या’ क्रिकेटरने निवडली भारतीय संघाची प्लेइंग ११
वयाचा हवाला देत निवडकर्त्यांनी केलं दुर्लक्ष; उनाडकट म्हणाला, ‘मी ३३ नाही २९चा आहे’
पाकिस्तान बोर्डाच्या खराब आयोजनामुळे माजी कर्णधाराची फजिती, अबू धाबीच्या विमानाकडून ‘नो एंट्री’!