---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज म्हणतो, ‘पाकिस्तान टी२० विश्वचषक जिंकणार नाही जर बाबर आझमने…’

On: बुधवार, जुलै 27, 2022 11:05 PM
Babar Azam
---Advertisement---

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक विक्रम रचत आहे. वयाच्या २७व्या वर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये तो आपला ठसा उमटवत आहे. आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) ताज्या क्रमवारीमध्ये तो टी२० आणि वनडेत अव्वल क्रमांकावर आहे. तर कसोटीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरच्या या यशाबाबत क्रिकेटविश्व आश्चर्यचकित झाले असताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉन्टिंगने त्याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या संधींबाबत रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याने आयसीसीच्या चर्चेत म्हटले, “बाबरची पाकिस्तान क्रिकेट संघातील जागा आणि त्याच्या कामगिरीचा संघावर होणारा परिणाम. तो खेळाडू म्हणून कसा सुधारला आहे यावर विचार केला असता त्याच्यात आमुलाग्र बदल दिसून आले आहेत. त्याचा हा फॉर्म असाच कायम राहिला पाहिजे मात्र जर त्याने टी२० विश्वचषकात धावा नाही केल्या तर पाकिस्तान चषक जिंकणार नाही.”

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वकार युनूस (Waqar Younis) याने अलीकडेच दावा केला की बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वाखालील संघाकडे दुसरा टी२० विश्वचषक जिंकण्याची उत्तम संधी आहे. ते गेल्या वर्षी युनायटेड अरब अमिरातीमध्ये जवळ आले होते जेव्हा त्यांनी साखळी फेरीत उत्तम कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. ज्यात दुबईमध्ये भारताविरुद्ध १० गडी राखून ऐतिहासिक विजयाचा समावेश होता. केवळ उपांत्य फेरीत विजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. पण पाँटिंगला या हंगामात पाकिस्तानकडून मागच्या स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती होईल याची अपेक्षा नाही.

तसेच या चर्चेमध्ये पॉन्टिंगने बाबरचे कौतुक केले आहे. “काही वर्षापूर्वी मी त्याला ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना पाहिले आहे. तेव्हाच समजले होते की हा खेळाडू विशेष आहे. मात्र जर तो टी२० विश्वचषकात धावा नाही करू शकला तर पाकिस्तान या स्पर्धेत टिकणार नाही,” असेही पॉन्टिंगने म्हटले आहे.

बाबर बरोबरच पॉन्टिंगने पाकिस्तान संघाच्या सलामीवीर मोहम्मद रिजवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी यांचेही संघातील स्थान किती आणि का महत्वाचे आहे याची चर्चा केली आहे. तो म्हणाला, “पाकिस्तान संघाचे सलामीवीर महत्वाचे आहेत. त्याच्याबरोबरच त्यांचे गोलंदाज नवीन चेंडूने चांगली कामगिरी करतात. मात्र ऑस्ट्रेलियात त्यांच्या फिरकीपटूंची कसोटी लागणार आहे”

बाबरने २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय टी२०त पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ७४ सामन्यात ४५.५२च्या सरासरीने २६८६ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

शुबमन गिलने वेस्ट इंडिज गोलंदाजाच्या चेंडूवर ठोकला असा षटकार की बदलावा लागला चेंडू

मैदान तुम्हारा धमाका हमारा! बार्बाडोसमध्ये १० वर्षांपासून फक्त भारतीय सलामीवीरांचीच हवा

धवन-गिल जोमात, वेस्ट इंडिज कोमात! तिन्ही वनडेत कॅरेबियन्सना फुल नडले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---