वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी हैराण करणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी इंग्लंडमधील वांशिक भेदभावाबद्दल मत मांडले आहे. वर्णद्वेषाविरुद्ध बोलणाऱ्या होल्डिंग यांनी मान्य केले की, ते युवा अवस्थेत असताना आक्रमक स्वभावाचे होते. यामुळेच त्यांना वाटत होते की, ते इंग्लंडमध्ये राहू शकले नसते. (Former West Indies fast bowler Michael Holding made a big secret explosion)
इंग्लंडमध्ये जन्मलो असतो, तर कदाचित मी जिवंत नसतो, असे वक्तव्य होल्डिंग यांनी केले आहे. ते म्हणाले की, “मला नाही वाटत की मी आज जिवंत असतो. युवा अवस्थेमध्ये मी खूप आक्रमक स्वभावाचा होतो. 1980 मध्ये मी रागाच्या भरात न्यूझीलँड मध्ये गवतावर लाथ मारली होती. अशा परिस्थितीतून जाताना तुम्ही मला बघू शकला असता का. ज्या मधून इबनी गेली होती.”
द टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या सहकारी समालोचक आणि आणि माजी महिला क्रिकेटपटू इबनी रेनफोर्ड-ब्रेंट यांच्याबाबत चर्चा केली की, युकेमध्ये राहत असताना ती अनेक समस्यांना मधून गेली होती.
त्यांनी सांगितले की, “जमैका मध्ये राहत असताना मी वर्णद्वेषाचा सामना केला नाही. जमैकामधून निघाल्यानंतर मी प्रत्येक वेळेस हे सहन केले आहे. जेव्हा केव्हा मला असे काहीतरी अनुभवायला मिळते, तेव्हा मी फक्त असे म्हणायचो की ‘हे तुझे आयुष्य नाही, तू लवकरच घरी परत जाशील.’ मी जर त्यांच्याविरुद्ध कधीही आवाज उठवला असता, तर माझी कारकीर्द इतकी दीर्घ असली नसती. ना मला टेलिव्हिजनवर नोकरी मिळाली असती.”
होल्डिंग ने सांगितले की, “मी हे भूतकाळात खूप वेळा पाहिले आहे की, काळे लोक आपल्या हक्कासाठी लढतात आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. त्यासाठी त्यांना त्रास दिला गेला आहे. जर मी कधी काही बोललो असतो, तर ते म्हणाले असते की, ‘आणखी एक युवा काळा व्यक्ती. या लोकांपासून सुटका करून घेतली पाहिजे.’ मी कचऱ्याच्या पेटीमध्ये पडलेला दुसरा व्यक्ती असतो.”
इबनी रेनफोर्ड ब्रेंट इंग्लंडकडून खेळणारी पहिली अश्वेत (काळी) महिला होता. ती सन २००९ चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही भाग होती.
होल्डिंग यांच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी वेस्ट इंडिजकडून ६० कसोटी सामने खेळले. यात त्यांनी २३.६८ च्या सरासरीने २४९ विकेट्स घेतल्या होत्या. यासोबतच त्यांनी १०२ वनडे सामने खेळताना २१.३६ च्या सरासरीने १४२ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉकडाऊनमध्ये पत्नीने कापले होते पुजाराचे केस; खुलासा करत म्हणाला, ‘पूजाने माझे केस फक्त एकदा…’
तयारी श्रीलंका दौऱ्याची! फिटनेससाठी हार्दिक पंड्या गाळतोय घाम; शर्टलेस फोटो व्हायरल
WTC Final, INDvsNZ, Day 5: राखीव दिवस ठरणार रोमांचक; पाचव्या दिवसाखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी