मुंबई । एम.एस. धोनी जगातील सर्वात चतुर कर्णधार मानला जातो. मातीला सोनं बनवणाऱ्या धोनीचे जगभर चाहते आहेत. शांत आणि संयमी स्वभावाच्या धोनीच्या नेतृत्वाचे अनेक जण दिवाने आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली टी-२० वर्ल्डकप, वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने तीन वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. याच दोघे बद्दल संघातील अनुभवी खेळाडू हरभजन सिंग याने धोनीबद्दल एक आश्चर्यचकित करणारे विधान केले आहे. हरभजन सिंगच्या मते, धोनी गोलंदाजांची धुलाई करू देतो, पण त्यांना सल्ले देत नाही.
हरभजन सिंग एका संकेतस्थळाशी बोलताना म्हणाला, धोनी इतर कर्णधारांपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. इतर कर्णधार गोलंदाजाला काय करावे आणि काय करू नये याविषयी सतत सल्ले देत राहतात, पण महेंद्रसिंग धोनी असे करत नाही. गोलंदाजास पूर्ण स्वातंत्र्य देतो. गोलंदाज स्वतः खेळाडूंना क्षेत्ररक्षणासाठी लावतात. पाहिजे त्या पद्धतीने गोलंदाजीची रणनीती आखतात.
हरभजन सिंग पुढे बोलताना असेही म्हणाला, यष्टी पाठीमागे थांबताना धोनी फलंदाज काय करू शकतो याचा अंदाज देखील आम्हाला वेळोवेळी सांगतो. पण चेंडू कुठे आणि कसा टाकायचा याचे सल्ले मात्र तो देत नाही.
हरभजन सिंग पुढे बोलताना म्हणाला, एका सामन्यात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर विरोधी संघ तुटून पडला होता. पुणे येथे झालेल्या सामन्यात त्याची चांगली धुलाई होत होती. पण धोनी त्याला काहीच सांगत नव्हता. मी धोनी जवळ गेलो आणि त्याला शार्दुलला काही वेगळे करण्यासाठी सांग असे सांगितले. त्यावर धोनी म्हणाला की शार्दूल कडे खूप वेळ आहे. आता जर मी त्याला सांगितलं तर तो गडबडून जाईल. त्यामुळे त्याला मार खाऊ दे. शार्दुलचे गोलंदाजीतील सर्व पर्याय संपतील तेव्हा मी त्याला सांगेल. तोपर्यंत त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे गोलंदाजी करू दे.