लखनऊच्या एकना स्टेडियमवर सध्या मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात इराणी चषकाचा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना सरफराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईनं 537 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरात, रेस्ट ऑफ इंडिया दुसऱ्या डावात अप्रतिम फलंदाजी करत आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या 191 धावांच्या खेळीच्या जोरावर संघानं 400 धावांचा टप्पा पार केला. आज सामन्याचा चौथा दिवस असून सामना ज्या प्रकारे सुरु आहे, ते पाहता काही निकाल लागेल असं वाटत नाही. हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता जास्त आहे.
अशा स्थितीत चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की, जर हा सामना अनिर्णित राहिला तर इराणी चषकाचा विजेता कोण बनेल? याचा निर्णय घेण्यासाठी दुसरा सामना खेळवण्यात येणार नाही. जर सामना अनिर्णित राहिला, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल का? हा देखील प्रश्न आहे. काय आहेत नियम, हे येथे जाणून घ्या.
नियमांनुसार इराणी चषकाचा सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावात आघाडी मिळवणाऱ्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया सामन्यात, जर मुंबईचा संघ रेस्ट ऑफ इंडिया संघाला 537 धावांच्या आत रोखण्यात यशस्वी ठरला, तर ते विजेते होतील. दुसरीकडे, रेस्ट ऑफ इंडिया संघानं पहिल्या डावात 537 धावा केल्या, तर विजेतेपद त्यांच्याकडे जाईल.
शेवटच्या वेळी 2018-19 हंगामात विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील सामना अनिर्णित राहिला होता, ज्यानंतर पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे इराणी चषकाचा विजेता ठरविण्यात आला. पहिल्या डावातील आघाडीमुळे विदर्भाच्या संघानं विजेतेपद पटकावलं होतं.
हेही वाचा –
लग्न बंधनात अडकला दिग्गज फिरकीपटू, क्रिकेट जगतातील अनेक स्टार्सची उपस्थिती
सूर्यकुमार यादव की शिवम दुबे, रोहित शर्माचा विक्रम कोण मोडणार?
द्विशतक हुकले पण टीम इंडियासाठी दावा मजबूत, इराणी कपमध्ये या खेळाडूची मोठी कामगिरी