सध्या भारतीय क्रिकेटमध्ये काही आलबेल दिसत नाही. मागील जवळपास महिनाभरापासून बीसीसीआय आणि विराट कोहली हा वाद रंगत आहे. त्याच वेळी काही दिवसांपूर्वी भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. त्यामुळेदेखील नवा वाद निर्माण झाला होता. आता या वक्तव्यावर रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Ravi Shastri statement)
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “कुलदीप यादव (Kuldeep Yadav) परदेशातील एक चांगला गोलंदाज आहे, असे म्हटल्याने जर आर अश्विनला वाईट वाटले असेल तर मला आनंद आहे की, मी असे म्हटले. यामुळे त्याला काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळाली.” कुलदीप यादवला २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. त्यावेळी आर अश्विनला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. याच सामन्यात कुलदीप यादवने ५ गडी बाद केले होते. त्यानंतर रवी शास्त्रींनी त्याला परदेशातील एक चांगला गोलंदाज म्हटले होते.
काय म्हणाला होता आर अश्विन?
भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनने (R ashwi काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले होते की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर २०१९ मध्ये सिडनी कसोटीत कुलदीप यादवने ५ गडी बाद केले होते. त्यानंतर रवी शास्त्रींनी त्याला परदेशातील चांगला गोलंदाज असे म्हटले होते, त्यावेळी तुला कसे वाटले होते?” या प्रश्नाचे उत्तर देत आर अश्विन म्हणाला होता की, ” मी खरच खुश होतो कारण ऑस्ट्रेलियामध्ये एक फिरकी गोलंदाज म्हणून ५ गडी बाद करणे खूप मोठी गोष्ट आहे. पण, शास्त्रींच्या या वक्तव्याने मी पूर्णपणे निराश झालो होतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी रवी भाईचा आदर करतो. आम्ही सर्वच करतो आणि मला समजले आहे की सर्व काही सांगूनही आपण आपले शब्द मागे घेऊ शकतो. त्यामुळे मला खूप त्रास झाला होता. मी पूर्णपणे तुटलो होतो.”
महत्वाच्या बातम्या :
Video: शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज, फलंदाजीसाठी समोर ट्रेंट बोल्ट; मग काय ‘असा’ ठोकला षटकार
हे नक्की पाहा