---Advertisement---

पृथ्वी शॉने ‘ही’ गोष्ट केली तर सामना दिल्लीच्याच हातात येईल, दिग्गजाचा सल्ला

On: सोमवार, नोव्हेंबर 9, 2020 11:42 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनराईझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. पण या सामन्यात पृथ्वी शॉला दिल्लीच्या अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती. मागील काही सामन्यात शॉची बॅट शांतच राहिली आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शॉला एक सल्ला दिला आहे.

….तर सामना येईल दिल्लीच्या ताब्यात

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की,”पृथ्वी शॉ ज्या शैलीने खेळतो, त्यानुसार जर त्याने 10 षटके फलंदाजी केली, तर सामना दिल्लीच्या ताब्यात येईल. परंतु समस्या अशी आहे की पृथ्वीला 10 चेंडूसुद्धा खेळण्यात अपयश आले आहे. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत, त्याला फॉर्ममध्ये परत यावे लागेल.”

फलंदाज फॉर्ममध्ये नसणे ही दिल्लीसाठी चांगले लक्षण नाही

“दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज फॉर्ममध्ये नसणे ही या संघासाठी नुकसानदायक बाब आहे. पृथ्वी शॉबद्दल बोलायचं झालं, तर त्याचाही फॉर्म कुठेतरी हरवलेला आहे. परंतु विरुद्ध संघात चांगल्या वेगवान गोलंदाजांची अनुपस्थिती पृथ्वीला मदत करु शकेल.”

भारतीय संघातील फलंदाज ही दिल्लीची ताकद

दिल्लीच्या फलंदाजीबद्दल बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “दिल्लीत भारतीय संघातील अव्वल 5 फलंदाज आहेत. ही या संघाची ताकद आहे. इतर कोणत्याही संघात असे सामर्थ्य नाही. शिखर आणि पृथ्वी डावाची सुरुवात करतात आणि त्यानंतर रहाणे, अय्यर आणि पंत फलंदाजीला येतील.”

स्पर्धेच्या अखेरीस अय्यरने गमावला फॉर्म
फलंदाजांच्या फॉर्मबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला की, “अजिंक्य रहाणेने फक्त एक चांगला डाव खेळला आहे. अर्थात त्याने हंगामातील सर्व सामने खेळले नाहीत. स्पर्धेच्या अखेरीस श्रेयस अय्यरनेही आपला फॉर्म गमावला आहे. रिषभ पंत हंगामात कधीच फॉर्मात नव्हता.

पृथ्वीची आयपीएल 2020 मधील कामगिरी

पृथ्वीने आयपीएल 2020 मध्ये 13 सामन्यांत 17.53 च्या सरासरीने 228 धावा केल्या आहेत.यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 66 ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ खेळाडूची केएल राहुलच्या ऑरेंज कॅपवर नजर, तर रबाडा-बुमराहमध्ये पर्पल कॅपसाठी चूरस

Video – श्रेयस अय्यर विसरला आपल्याच संघातील खेळाडूचे नाव, वॉर्नरने करुन दिली आठवण

….म्हणून मार्कस स्टॉयनिसला सलामीला पाठवले, श्रेयस अय्यरने केला खुलासा

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये

लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू

RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---