विराट कोहलीने भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्याच्या घोषणेनंतर, आता त्याने आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद सोडावे की नाही?, यावर चर्चा सुरू झाली आहे. कारण आयपीएलमधील कामाचा ताणही आंतरराष्ट्रीय स्पर्धांपेक्षा कमी नसतो. त्यामुळे जर आरसीबीचा संघ यावर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरला, तर कोहली आरसीबीचे कर्णधारपदही सोडण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे की, ‘कोहलीच्या बाजूने ही घोषणा का झाली? तुम्हाला वाटतंय की कामाचा ताण कमी झालाय, पण तसे नाही?’
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘कोरोना महामारीनंतर भारतीय संघाने डिसेंबर २०२० पासून फक्त ८ टी-२० सामने खेळले आहेत. मला वाटते की, यापेक्षा आयपीएलचे सामने अधिक खेळले गेले आहेत. आयपीएलमध्ये कर्णधार होणे ही सोपी गोष्ट नसते. ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे आणि फ्रँचायझींचे याकडे दुर्लक्ष होत आहे आणि ते वाढतच आहे’
बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, ‘कोहली आरसीबीचे कर्णधारपदही सोडेल का? त्याच्यावरचा कामाचा ताण अजूनही संपलेला नाही. फलंदाजीत अफाट यश मिळवल्यानंतरही, कोहली व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये, विशेषतः आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून यश मिळवण्यात अपयशी ठरला आहे.’
विराट कोहलीचा कर्णधार म्हणून आरसीबीसाठी अत्यंत खराब रेकॉर्ड राहिला आहे. तो २०१३ पासून या संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. पण तो एकदाही संघाला विजेतेपद पटकावून देऊ शकलेला नाही. सन २०१६ नंतर, आरसीबीचा संघ गेल्यावर्षी प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. २०१७ आणि २०१९ मध्ये तो गुणतालिकेच्या तळाशी होता, तर २०१८ मध्ये संघ सहाव्या क्रमांकावर होता.
सन २०१६ चा हंगाम कोहलीसाठी उत्तम होता, त्या साली त्याने ९७३ धावा केल्या होत्या. त्यानंतर केवळ २०१८ मध्ये कोहली ५०० धावांच्या पुढे पोहोचू शकला आहे. आयपीएल २०२१ च्या हंगामात, त्याची ७ सामन्यांत ३३ ची सरासरी राहिली आहे, ज्यात फक्त एक अर्धशतक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित टी२०चा कर्णधार बनल्यास उपकर्णधारासाठी निवडकर्त्यांची माथापच्ची, ‘ही’ नावे शर्यतीत आघाडीवर
‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड
न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने संतापले पाकिस्तानी चाहते; म्हणे, ‘क्राइस्टचर्चचा गोळीबार विसरलात का?’