Mohammed Shami : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गतवर्षी झालेल्या वनडे विश्वचषकानंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. सध्या तो संघात पुनरागमन करण्यासाठी तयारीला लागला आहे. शमीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शमी दुखापतीनंतरही विश्वचषक खेळला आणि 7 सामन्यांत 24 विकेट्स घेऊन तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मात्र, सध्या शमी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो खास डाएटही फॉलो करत असल्याचा खुलासा त्याचा जवळचा मित्र उमेश कुमारने केला आहे.
उमेशने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, “शमीला सर्व काही परवडते, पण तो मटणाशिवाय राहू शकत नाही. तो एक दिवस मटणाशिवाय घालवू शकतो. पण दुसऱ्याच दिवशी मटणाशिवाय त्याला त्रास होऊ लागतो आणि तिसऱ्या दिवशी त्याचे स्वत:च्या भावनांवरील नियंत्रण सुटू लागते. जर त्याने दररोज एक किलो मटण खाल्ले नाही तर त्याचा वेग ताशी 15 किमी कमी होईल.”
शमी या मालिकेतून पुनरागमन करू शकतो
दरम्यान, नुकताच मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी आशा व्यक्त केली होती की, वेगवान गोलंदाज शमी लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होईल. शमी 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची पूर्ण अपेक्षा आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगरकर म्हणाले होते की, “आम्हाला जवळपास माहित आहे की कोणते खेळाडू आहेत. काही खेळाडूंना दुखापत झाली आहे, पण ते लवकरच परततील अशी आशा आहे. शमीने गोलंदाजी सुरू केली आहे जे चांगले लक्षण आहे. बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून सुरू आहे आणि शमीच्या पुनरागमनाचे हे नेहमीच लक्ष्य होते.”
दरम्यान शमीने नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे विश्वचषक 2023 चा अंतिम सामना खेळला होता. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात स्थान मिळालं नाही, आयपीएल विजेता खेळाडू गेला इंग्लंडला; काउंटी क्रिकेटमध्ये नशीब आजमावणार
आशिया चषक 2024 : सेमिफायनलमध्ये रेणुका सिंगचा कहर! भारताचा सलग नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक