---Advertisement---

…तर होऊ शकते आयपीएल २०२० चे आयोजन

On: शुक्रवार, मे 8, 2020 11:21 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण क्रिकेट क्षेत्र ठप्प पडले आहे. तसेच, बीसीसीआयने आयपीएललाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, बुधवारी (६ मे) बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी टेली कॉन्फरन्सिंग करत आयपीएलच्या नियोजनाबाबत संभावना व्यक्त केली आहे. If t20 world cup postponed then bcci find a window to ipl.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पदाधिकाऱ्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाला पुढे ढकलण्याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे, टी२० विश्वचषक पुढे ढकलल्यास आयपीएल घेण्याच्या निर्णयाला पदाधिकाऱ्यांनी सहमती दिली आहे. तसेच, त्यांनी यावर्षांच्या शेवटी भारतात कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटचे आयोजन करण्यात येणार नसल्याचीही शक्यता वर्तवली आहे.

जर, आयपीएलचे आयोजन करण्याची संधी मिळाली. तर, परदेशी खेळाडूंनाही सामील केले जाण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनुसार, परदेशी खेळाडू हे मोठी समस्या ठरू शकत नाहीत. कारण,  परदेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळवण्यासाठी जी एनओसी जाहीर केली जाते, त्यासाठी प्रत्येक संघाच्या क्रिकेट बोर्डाला त्यांच्या संपूर्ण करारापैकी १० टक्के रक्कम मिळते. सध्या चालू असलेल्या परिस्थितीत कोणत्याही क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयशी हातमिळवणी करण्यास हरकत नसेल.

जर ऑस्ट्रेलियात होणारे टी२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आले तर बीसीसीआयला आयपीएलच्या नियोजनासाठी संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियामध्ये कोविड १९ या महामारीचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. पण तरीही सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, निर्धारित वेळेवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया टी२० विश्वचषकाचे आयोजन करू शकेल का?

ऑस्ट्रेलियाने ६ महिन्यांसाठी आपल्या देशाच्या सीमांना बंद ठेवले आहे. तसेच काही दिवसांपुर्वी असे म्हटले जात होते की, विश्वचषकाचे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये घेतले जातील. पण आयसीसीच्या अधिकतर सदस्यांनी या निर्णयाला नकार देत म्हटले की, टी२० विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये होऊ शकत नाही.

यावर बीसीसीआयचे पदाधिकारी म्हणाले की, १-२ सामने प्रेक्षकांविना होऊ शकतात. पण विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा प्रेक्षकांविना घेणे अशक्य आहे. परंतु, आयपीएलच्या आयोजनाची संभावना असल्यास, ते सामने प्रेक्षकांविना घेण्यास काही हरकत नसेल. पण, या परिस्थितीत काहीही सांगता येत नाही. मात्र हे स्पष्ट आहे की, आम्ही खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षकांच्या आरोग्याविषयी कोणतीही जोखीम घेऊ शकत नाही.

आम्ही बघू की,भारत सरकार क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी टी२० विश्वचषकाचाबाबत काय निर्णय घेईल आणि त्यानुसार पुढील तयारीला लागू. जर भारत सरकारने होकार दिला, तर भविष्यात बीसीसीआय यावर निर्णय घेईल, असेही बीसीसीआयचे पदाधिकारी पुढे म्हणाले.

ट्रेंंडिंग घडामोडी – 

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील सामना म्हणजे भारत-पाकिस्तानमधील सामना

मुंबई इंडियन्स विरुद्ध घेतलेल्या हॅट्रिकबद्दल रोहित शर्मा म्हणाला…

डेविड वॉर्नरने निवडला सार्वकालिक आयपीएल संघ पण ‘या’ २ दिग्गज क्रिकेटपटूंना नाही दिले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---