fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

महाराष्ट्राकडून पुन्हा खेळायला मिळाले तर ? याप्रश्नांला नेहा घाडगेने दिले असे उत्तर..

महाराष्ट्र(Maharashtra), भारतीय रेल्वे (Indian Railway) व गोवा (Goa) अशा संघाचे प्रतिनिधित्व केलेली पश्चिम रेल्वेची राष्ट्रीय खेळाडु नेहा घाडगे (Neha Ghadge) यांनी खेल कबड्डी डॉट इन (khelkabaddi.in) या वेबसाईटच्या फेसबुक पेजवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.

यावेळी एका चाहत्याने नेहाला, “महाराष्ट्राकडून पुन्हा खेळायला मिळाला तर….?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना नेहाने सांगितले की, ” महाराष्ट्राकडून खेळायला मिळाले तर मी आयुष्यात जेवढी मेहनत घेतली नसेल तेवढी मेहनत करेल. कारण पुन्हा एकदा महाराष्ट्र संघाची जर्सी घालणं हे प्रत्येकाच स्वप्न असतं. जेव्हा २०१२ साली नॅशनल खेळलो होते तेव्हा महाराष्ट्र २-३ गुणांनी हारला होता.

रेल्वेची खेळाडु असून पण महाराष्ट्राकडून पुन्हा खेळायची संधी मिळाली तर मी अजून चांगली कामगिरी करू शकते. जर मी गोव्याकडून खेळून चांगली कामगिरी करू शकते तर महाराष्ट्रा संघातून खेळताना नक्कीच त्यापेक्षा चांगली कामगिरी करेन. कारण तेव्हा सर्व माणसं माझी असतील त्यामुळे बरच काही मिळेल महाराष्ट्र संघाकडून खेळायला मिळाला तर….अशाप्रकारे नेहाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

नेहा घाडगे पश्चिम रेल्वेची खेळाडु असून तिने भारतीय रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. ६७ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेहाला रेल्वेच्या अंतिम संघात स्थान मिळाले नाही त्यामुळे तिने यावर्षी गोवा संघाचे प्रतिनिधित्व करत संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

You might also like