जगभरात अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांनी 2 देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहे. यात विशेषत: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून खेळलेले क्रिकेटपटू केप्लर वेसेल्स यांचे नाव घेतले जाते. मात्र, जगभरात असा केवळ एकच क्रिकेटपटू आहे, ज्याने भारत आणि इंग्लंड संघांकडून कसोटी क्रिकेट खेळले आहे. इफ्तिखार अली खान (Iftikhar Ali Khan) असे या क्रिकेटपटूचे नाव असून, त्यांना ‘नवाब पतौडी’ या नावाने ओळखले जाते. आज (16 मार्च) त्यांची 112 वी जयंती आहे.
पतौडींचा मुलगा मंसूर अली खान हा भारताचा माजी कर्णधार होता. पतौडी यांना फटकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लॉर्ड्समध्ये नाबाद 231 धावांचा विक्रम केला होता.
2 डिसेंबर 1932 रोजी सिडनी येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यातून त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी पहिल्याच सामन्यात त्यांनी दमदार शतक ठोकले होते. त्यानंतर कसोटी मालिकेच्या उर्वरित सामन्यांमध्ये ते इंग्लंडच्या धोरणांशी असहमत असल्याने त्यांना संघात स्थान देण्यात आले नव्हते. पुढे त्यांनी 1934 पर्यंत इंग्लंड संघाकडून 2 कसोटी सामने खेळले. यावेळी त्यांनी 5 डावात 28.8च्या सरासरीने 144 धावा केल्या होत्या.
यानंतर पतौडींनी दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजेच 1946 मध्ये भारताकडून 3 कसोटी सामने खेळले होते. विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यात ते भारताचे कर्णधार होते. यावेळी त्यांनी 11च्या सरासरीने 55 धावा केल्या होत्या. त्यानंतर तब्येत खराब असल्यामुळे त्यांना संघात परत स्थान मिळाले नाही.
1952 मध्ये नवी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते 41 वर्षांचे होते.
महत्त्वाच्या बातम्या-
तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिनने केलं होतं ‘शतकांचं शतकं’
श्रीलंकन कर्णधाराने शतक झळकावताच विराटने खास अंदाजात केला सलाम; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
अखेर मिस्टर आयपीएल सुरेश रैना दिसणार मैदानावर, मोठी अपडेट पुढे