टेनिसविश्वाची 2022मधील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा यूएस ओपन (US Open). या स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) इगा स्विएटेक आणि ओन्स जॅबेयूरचा यांच्यात रंगला. या सामन्यात स्विएटेकने ट्यूनिशियाच्या ओन्स जॅबेयूरचा 6-2, 7(7)-6(5) असा पराभव केला. यामुळे तिने यूएस ओपन जिंकणारी पोलंडची पहिली टेनिसपटू होण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर तिचे हे कारकिर्दीतील तिसरे ग्रँड स्लॅम ठरले आहे.
या सामन्यातील पहिला सेट इगा स्विएटेक ( Iga Swiatek) हिने सहज जिंकला. मात्र दुसरा सेट खूपच रोमांचक झाला. ओन्स जॅबेयूर ( Ons Jabeur) हिने सेटमध्ये परतण्याचा प्रयत्न केला, पण तिला त्यामध्ये यश आले नाही. आर्थर ऐश स्टेडियमवर झालेल्या या सामन्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी दिसली.
Iga Swiatek is the #USOpen champion! 🇵🇱 pic.twitter.com/e35EM9b7nv
— US Open Tennis (@usopen) September 10, 2022
21 वर्षीय स्विएटेकचे हे हार्ड कोर्टवरील पहिले ग्रँड स्लॅम ठरले आहे. याआधी तिने 2020 आणि याचवर्षी फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहेत. तसेच एकाच वर्षात यूएस ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकणारी ती सेरेना विलियम्स हिच्यानंतर दुसरीच महिला टेनिसपटू ठरली आहे. सेरेनाने 2013मध्ये अशी कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर जॅबेयूरने हा सामना गमावला असला तरी या स्पर्धेच्याअंती ती जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहणार आहे. याआधी ती विम्बल्डन 2022च्या अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यामुळे ती ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली अरबी महिला ठरली होती. तर आता पुन्हा एकदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने तिने इतिहास घडवला आहे.
Welcome to the club, @iga_swiatek! pic.twitter.com/2Bflx9QN9Q
— US Open Tennis (@usopen) September 10, 2022
स्विएटेक ही पहिल्या सेटपासूनच जबरदस्त फॉर्ममध्ये दिसली. तिने उत्तम सर्व्ह करत 3-0 अशी आघाडी घेतली. 5वे मानांतकन असणाऱ्या जॅबेयूरनेही लागोपाठ गेम जिंकत सेट 3-2 असा केला. मात्र अव्वल क्रमांकाच्या स्विएटेक उत्तम खेळ करत 30 मिनिटांतच सेट 6-2 असा आपल्या नावे केला.
Tastes like victory 🏆 pic.twitter.com/mQyoFSHJD6
— US Open Tennis (@usopen) September 10, 2022
दुसरा सेटही पहिल्यासारखाच वाटला कारण पुन्हा एकदा स्विएटेकने 3-0 अशी आघाडी घेतली. तर तिने तीन ब्रेक पॉइंट्स मिळवत सेट 4-0 असा करण्याची संधी होती, मात्र नंतर जॅबेयूरने सर्व्ह करत सेट 3-2 असा केला. हा सेट चुरशीचा झाला. जॅबेयूरचे सामन्यात परतण्यासाठी आणि स्विएटेकचे सेट जिंकण्यासाठी चढाओढ सुरू होती. दोघींनीही त्यांचा सर्वोत्तम खेळ केल्याने सेट 6-6 असा झाला. मात्र शेवटच्या क्षणाला जॅबेयूरने चुका केल्याने त्याचा फायदा स्विएटेकला झाला.
The top two players in the world come Monday. pic.twitter.com/AMNIX1udbB
— US Open Tennis (@usopen) September 10, 2022
स्विएटेक हे या वर्षातील सातवे विजेतेपद तर एकूण 10वे विजेतेपदक आहे. तसेच तिने 37 सामने जिंकण्याचा पराक्रमही केला आहे, जे या शतकातील विक्रम आहे. तिने 2018मध्ये कारकिर्दीतील पहिला सामना गमावल्यानंतर पुढील 10 सामने जिंकले असून तेही सर्व सामने सरळ सेटमध्ये
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकाचा किंग कोण? ‘या’ संघाने सर्वाधिकवेळा जिंकलाय कप, पाहा संपूर्ण यादी
वयाच्या 36 व्या वर्षीही स्टुअर्ट ब्रॉडची गाडी सुसाट! केली माजी दिग्गजाच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
आशिया चषकाच्या फायनलपूर्वी हर्षा भोगलेनी निवडली स्पर्धेतील बेस्ट प्लेइंग 11! वाचा कोणाला मिळाली संधी