महाकुंभ मेळावा सुरू झाल्यापासून, दररोज लाखो लोक प्रयागराजला पोहोचत आहेत. अलिकडे आयआयटी बाबा (IIT Baba) खूप चर्चेत आहेत. त्यांने आयआयटी मुंबई येथून एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो असा दावा करत आहे की त्याच्यामुळेच भारताने 2024चा टी20 विश्वचषक जिंकला.
एका मीडिया मुलाखतीत आयआयटीय बाबाला विचारण्यात आले की, ते क्रिकेट पाहतात का? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “हो, मी खूप क्रिकेट पाहिले आहे. मी भारताला 2024चा टी20 विश्वचषक जिंकवून दिला. मी वारंवार सांगत होतो की चेंडू हार्दिक पंड्याला द्या, पण रोहित शर्मा तसे करत नव्हता.”
आयआयटीयन बाबाचे खरे नाव अभय सिंग (Abhay Singh) आहे, त्याने भारताला टी20 विश्वचषक जिंकून देण्याची पद्धत देखील सांगितली. तो म्हणाला, “येथे बसून तुम्हाला सिग्नलशी कनेक्ट व्हावे लागेल आणि जर तो सिग्नल लाईव्ह येत असेल तर तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की ती ऊर्जा त्याच स्वरूपात येत आहे. तीच ऊर्जा लाटांच्या स्वरूपात टॉवरवर आदळते. आता ऊर्जा त्या टॉवरपर्यंत पोहोचते ते तिथे कसे पोहोचले? खरेतर कॅमेऱ्याने ती ऊर्जा शोषून घेतली होती. सत्य हे आहे की तुम्ही सामना लाईव्ह पाहत आहात, पण त्यादरम्यान माहितीचा वापर केला जात आहे, ज्याला तांत्रिक भाषेत कोड-डीकोड म्हणता येईल.”
2024 मध्ये भारताने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिग्गज खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) देण्यात आला होता.
हमें पिछली साल वाला T- 20 वर्ल्ड कप IITian बाबा ने जितवाया था 😍
जय हो IITian बाबा जी की ✌️यकीन न हो तो सुन कर विचार व्यक्त करें 👇😃 pic.twitter.com/SRoQpRyRN7
— सरकारी मास्टर BSTCधारी (@O_MasterG) January 21, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी निवड न झाल्याने सूर्यकुमार यादवने व्यक्त केले दु:ख! म्हणाला…
बीसीसीआयच्या नव्या नियमांवर इंग्लंड कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “हे नियम चुकीचे…”
चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षक कोण? केएल राहुल की रिषभ पंत? पाहा आकडेवारी