---Advertisement---

कर्णधार कोहली संघासाठी करु शकतो ही गोष्ट एका षटकात सहा वेळा

---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी (24 आॅक्टोबर) विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 157 धावांची नाबाद शतकी खेळी केली. याबरोबरच त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावांचा टप्पा पार केला. वनडेमध्ये हा टप्पा पार करणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला.

त्याच्या या खेळीत त्याने त्याची 150 वी धाव पूर्ण करताना डाइव्ह (सूर मारुन क्रिजमध्ये परतणे) मारली होती. ही डाइव्ह त्याने 200 मिनिटांपेक्षा जास्त काळ फलंदाजी केल्यानंतर मारली होती. त्यामुळे त्याच्या फिटनेसचे आणि जिद्दीचे कौतुक झाले होते.

याबद्दल विराटने बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तो एका षटकात सहा वेळाही संघासाठी डाइव्ह मारु शकतो.

या मुलाखतीत विराट म्हणाला, ‘माझ्यासाठी देशाचे प्रतिनिधित्व करणे ही आभिमानाची गोष्ट आहे. 10 वर्षांनतरही मला असे वाटत नाही मी यासाठी पात्र आहे. देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना प्रत्येक धावेसाठी तूम्हाला कष्ट घ्यावे लागतात.’

‘इथे येण्यासाठी अनेक लोकांची खूप इच्छा असते. जेव्हा तूम्ही या स्तरावर आहात तर मग तूमच्यामध्येही तीच जिद्द असायला हवी. कोणत्याही स्तरावर असताना तूम्ही कोणतीही गोष्ट गृहीत धरु शकत नाही किंवा सहज घेऊ शकत नाही.’

‘मला जर एका षटकात सहा वेळा डाइव्ह मारावी लागली तरी मी ती संघासाठी मारेल. हेच माझे कर्तव्य आहे आणि म्हणूनच माझी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. हेच माझे काम आहे.’

‘ही गोष्ट म्हणजे कोणाला महत्त्व देण्यासाठी किंवा तूम्ही बांधील आहात हे दाखवण्यासाठी नाही. हे प्रयत्न संघासाठी फक्त अतिरिक्त धाव घेण्यासाठी होते. त्याक्षणी लक्ष्यकेंद्रीत असणे महत्त्वाचे होते.’

‘मी थकलो आहे किंवा मानसिकदृष्ट्या तिथे नाही असा विचार करण्यापेक्षा अतिरिक्त धाव करणे आवश्यक होते. प्रत्येकवेळी संघासाठी गरजेच्या गोष्टी करणे हाच माझा उद्देश असतो. संघाला मदत होइल ते सर्व प्रयत्न मी करतो.’

भारतीय संघाचा विंडीज विरुद्ध तिसरा वनडे सामना शनिवारी (27 आॅक्टोबर) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पुण्यातील वन-डे क्रिकेटचा इतिहास कुणाच्या बाजूने?

Video: भारतीय संघाची डोकेदुखी वाढली; रिषभ पंत झाला दुखापतग्रस्त

मुंबई पोलिसांनी अनोख्या अंदाजात केले विराट कोहलीचे कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment