---Advertisement---

रिषभ पंतने गर्लफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत लिहिले, मी जेव्हा तूझ्याबरोबर असतो तेव्हा…

On: शुक्रवार, जानेवारी 3, 2020 5:40 PM
---Advertisement---

मागील 2 आठवडे भारतीय संघाचे कोणतेही क्रिकेट सामने नसल्याने या 2 आठवड्यात भारतीय क्रिकेटपटूंनी सुट्यांचा आनंद घेतला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही या कालावधीत त्याची प्रेयसी इशा नेगीबरोबर वेग घालवला आहे.

त्याने गुरुवारी या सुट्ट्यांदरम्यानचा इशाबरोबरचा फोटो इंस्टाग्रामला शेअर केला आहे. या फोटोत दिसते की रिषभ आणि इशा बर्फाळ प्रदेशात उभे आहेत. या फोटोला रिषभने कॅप्शन दिले आहे की ‘मी जेव्हा तूझ्याबरोबर असतो तेव्हा मला अधिक चांगले वाटते.’

https://www.instagram.com/p/B60_hRaHdry/

इशानेही पंतबरोबरचा फोटो शेअर केला असून तिने कॅप्शन दिले आहे की ‘5 वर्षे आणि पुढेही ही मोजणी चालू राहील.’

https://www.instagram.com/p/B61BHcuAyQ-/

रिषभ सध्या क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरत आहे. त्याला मागील अनेक सामन्यांपासून मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. असे असले तरी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला पाठिंबा दिला आहे.

रिषभ आता 5 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका विरुद्धच्या टी20 मालिकेत खेळताना दिसणार आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1213049913040195584

https://twitter.com/Maha_Sports/status/1213022593730535429

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---