---Advertisement---

कोहलीच्या या गोष्टीची रिषभ पंतला वाटते सर्वात जास्त भीती

On: शनिवार, मार्च 23, 2019 6:36 PM
---Advertisement---

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या एका गोष्टीबाबत भीती वाटत असल्याचा खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की विराटच्या रागाची त्याला भीती वाटते.

याचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्स संघाने त्यांच्या सोशल मीडिया आणि अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंत म्हणाला, ‘मी कोणालाही घाबरत नाही, पण विराटच्या रागाची भीती वाटते.’

तो पुढे म्हणाला, ‘पण जर सर्व काही योग्य केले तर विराट का चिडेल. परंतू जर तूम्ही काही चूक केली आणि कोणी तूमच्यावर चिडले तर ते तूमच्यासाठी चांगलेच आहे. कारण तूम्ही तूमच्या चूकांमधून शिकत असता.’

भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने निवृत्ती घेतल्यानंतरपंत हा त्याचा वारसदार म्हणून प्रबळ दावेदार आहे. त्याला काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेत शेवटच्या दोन सामन्यात धोनीला विश्रांती दिल्याने संधी देण्यात आली होती.

या मालिकेतील चौथ्या सामन्यात यष्टीरक्षण करताना खूप चूका झाल्या होत्या. त्यामुळे विराटने त्याच्यावर नाराजीही व्यक्त केली होती.

पंत हा या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना उद्या (24 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसकेच्या प्रशिक्षकांचा कोहलीला पाठिंबा, टीका करणाऱ्या गंभीरला दिले उत्तर

आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्ससाठी ही आहे निराशाजनक बातमी…

हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आयपीएल महत्त्वाची…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment