---Advertisement---

विराटकडून झेल सुटल्यावर धोनी म्हणाला, बेटा; मुर्ख दुसऱ्या कुणाला बनव

On: रविवार, मे 10, 2020 3:01 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी शांत स्वभावासाठी जरी ओळखला जात असला तरी गोष्ट चुकिची असेल तर धोनी उत्तर द्यायला मागे पुढे पहात नाही.

याचा मोठा अनुभव भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आला होता.

२०१४मध्ये जेव्हा न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन कसोटी दरम्यान १४ धावांवर विराटने मॅक्क्युलमचा झेल सोडला होता तेव्हा त्याच डावात मॅक्क्युलमने नाबाद ३०२ धावा केल्या होत्या. ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर हा झेल सुटला तो गोलंदाज मोहम्मद शमी होता. यानंतर पुढे आणखी एका फलंदाजाचा त्याच्याच गोलंदाजीवर झेल सुटला.

यामुळे वैतागलेल्या शमीने लंचपुर्वीच्या शेवटच्या चेंडूवर बाऊंसर टाकला व तो धोनीच्या डोक्यावरुन थेट सीमारेषा पार गेला.

यावेळी शमीच्या या कृतीमुळे धोनी चांगलाच नाराज झाला. जेव्हा खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेले तेव्हा धोनीने शमीजवळ येत त्याला चांगलेच फटकारले होते.

यावेळी धोनी शमीला म्हणाला होता की, देख बेटा, अनेक खेळाडू माझ्या समोर आले आणि खेळून निघून गेले. मी तुझा सिनीयर आहे, तुझा कर्णधार देखील आहे. त्यामुळे मुर्ख दुसरं कुणाला बनवं.

कॅच सुटणं न सुटणं हे खेळाचा भाग आहे परंतु रागात येऊन चुकिची गोलंदाजी करणे वेडेपणा असल्याचा सल्ला तेव्हा धोनीने शमीला दिला होता.

हा सामना पुढे ड्राॅ राहिला होता. परंतु मॅक्क्युलमच्या नावावर एक खास विक्रम झाला होता. तो कसोटीत त्रिशतक करणारा पहिला न्यूझीलंडचा खेळाडू ठरला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---