मागच्या काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स हे तीन मुद्दे क्रिकेटविश्वात सर्वाधिक चर्चेचे ठरले होते. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याला आपला नवा कर्णधार बनवले. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. रोहितकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर फ्रँचायझीवर जोरदार टीका झाल्या. पण अशातच हार्दिक पंड्याबाबत एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे रोहितच्या चाहत्यांमध्ये एकप्रकारे बदला पूर्ण झाल्याची भावना पाहायला मिळाली.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला. कर्णधाराच्या त्याने मुंबईला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या. तसेच हार्दिक पंड्याला याला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये रोहितचे मार्गदर्शन आणि साथ मिळाली. असे असले तरी, आयपीएल 2024 पूर्वी हार्दिकनेच रोहितचे कर्णधारपद स्वतःकडे घेतले. फ्रँचायझीने देखील अष्टपैलू खेळाडूची साथ देत रोहितकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले. पण रोहितची यावर अद्याप एकही प्रतिक्रिया समोर आली नाहीये. आगामी आयपीएल हंगामात रोहित हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार, अशी समजूत चाहत्यांनी स्वतःच्या मनाला घातली होती. पण अशातच हार्दिकच्या दुखापतीची बातमी समोर येत आहे.
आयसीसी वनडे विश्वचषकादरम्यान हार्दिक दुखापतीमुळे पहिल्या चार सामन्यानंतर संघातून बाहेर झाला. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघात मोहम्मद शमीला संधी मिलाली आणि वेगवान गोलंदाजाने विश्वचषकात आपली झाप सोडली. असे असले तरी, हार्दिक आगामी मालिकेत अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची कुठलीच शक्यात सध्या दिसत नाहीये. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही तीन सामन्यांची टी-20 मालिका 11 ते 17 जानेवारीदरम्यान खेळली जाणार आहे. त्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2024 हंगामाची सुरुवात होऊ शकतो.
माध्यमांतील वृत्तांनुसार हार्दिक पंड्या फिटनेसच्या कारणास्तव आयपीएल 2024 हंगामातूनही बाहेर पडू शकतो. विश्वचषकात त्याला झालेली दुखापत गंभीर असून अद्याप यातून तो सावरला नाहीये. बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती दिली गेली आहे की, “हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत अद्याप कुठीलच ठोस माहिती मिळाली नाहीये. आयपीएळ संपण्याआधी तो उपलब्ध असेल, याबाबत खात्री देता येणार नाही.”
दरम्यान, आयपीएल 2022 आणि 2033 हंगामात हार्दिक पंड्या गुजरात टायटन्ससाठी खेळला. फ्रँचायझीने आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात हार्दिकला कर्णधार बनवले आणि विजेतेपद नावावर केले. आयपीएल 2023मध्येही हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने अंतिम सामना गाठला होता. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरातचा पराभव केला होता. त्याआधी हार्दिकने मुंबईसोबत चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. 2015 मध्ये त्याला पहिल्यांदा आयपीएल खेळण्याची संधी मुंबई इंडियन्सने दिली होती. 10 लाखांच्या बेस ब्राईसमध्ये पहिल्या आयपीएल हंगामात त्याला खरेदी केले गेले होते. पुढे आयपीएल 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबईने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. या चारही वेळी हार्दिक मुंबईचा संघात होता. 2021 हंगामात त्याने मुंबईसाठी शेवटचा सामना खेळला होता. पण आगामी हंगामासाठी तो पुन्हा आपल्या जुन्या संघात पुनरगामन करत आहे. (Important news regarding Hardik Pandya’s fitness ahead of IPL 2024)
महत्वाच्या बातम्या –
Video: पाकिस्तानी गोलंदाजाच्या घातक यॉर्करपुढे लागला नाही विस्फोटक मॅक्सवेलचा टिकाव, जोरात फिरवली बॅट अन्…
दीप्ती-पूजाच्या नावावर मोठा विक्रम, फिनिशर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली खेळी नेहमी उल्लेखली जाणार