गैर इस्लामी पद्धतीने निकाह (लग्न) केल्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तथा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. बुशरा बिबी यांचे प्रथम पती ख्वाजा मनेका यांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. बुशरा बिबी आणि इम्रान खान यांचा निकाह सोहळा 1 जानेवारी 2018 रोजी झाला होता.
दुसरा निकाह करण्यापूर्वी आवश्यक असलेला इद्दतचा कालावधी पाळण्याबाबत इस्लामी कायद्याचा भंग बुशरा बिबी यांनी केला असल्याचा आरोप ख्वाजा मनेका यांनी केला होता. आपली पूर्व पत्नी आणि इम्रान खान यांच्यात निकाह होण्यापूर्वी अनैतिक संबंध होते, असा आरोप देखील त्यांनी केला होता. इस्लामी कायद्यांतर्गत अनैतिक संबंधांना देहदंडाची शिक्षा आहे. ( Imran Khan and wife Bushra Bibi sentenced to seven years Jail sentence each in un-Islamic marriage case )
न्यायालयाने 14 तासांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर इम्रान खान आणि बुशरा बिबी या दोघांनाही दोषी ठरवले. यापूर्वी इम्रान खान यांना सायफर गैरव्यवहार प्रकरणी 10 वर्षांची आणि पती पती दोघांनाही तोशखाना गैरव्यवहार प्रकरणी 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोघांनाही मोठा दंड आणि सार्वजनिक पद स्वीकारण्यास देखील 10 वर्षे बंदी घालण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– IND vs ENG । भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंड 253 धावांवर सर्वबाद, एकट्या बुमराहने घेतल्या 6 विकेट्स
– पाहुण्यांची अचानक मैदानात उपस्थिती, थांबवावा लागला लागला श्रीलंका-अफगाणिस्तानमधील एकमात्र कसोटी सामना
– जसप्रीत बुमराहचा नाद यॉर्कर! स्टंप्स हवेत उडाल्यानंतर ओली पोप भलताच नाराज, पाहा VIDEO