---Advertisement---

पाहुण्यांची अचानक मैदानात उपस्थिती, थांबवावा लागला लागला श्रीलंका-अफगाणिस्तानमधील एकमात्र कसोटी सामना

On: शनिवार, फेब्रुवारी 3, 2024 4:08 PM
Uninvited guests in SL vs AFG test
---Advertisement---

अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील एकमात्र कसोटी सामना सध्या कोलंबोमध्ये सुरू आहे. शनिवारी (3 जानेवारी) यजमान श्रीलंका संघ सध्या पहिल्या डावात फलंदाजी करत आहे. प्रथम फलंदाजी करताना अफागणिस्तान संघाने 198 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात यजमान संघानी 300 पेक्षा जास्त धावा कुटल्या आहेत. शनिवारी उभय संघातील लाईव्ह सामना अचानक आलेल्या एका पाहुण्यामुळे थांबवावा लागला.

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा एकमात्र कसोटी सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सुरू झाला. कोलंबोमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या पारड्यात आला आणि यजमान संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ 62.4 षटकात 198 धावा करून सर्वबाद झाला. रहमत शाह याने 91 धावांची सर्वोत्तम खेळी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघाने या डावातील 47व्या षटकाखेर 3 बाद 215 धावा केल्या होत्या. 48व्या षटकात निजात मसूद गोलंदाजीला आला. खेळपट्टीवर त्यावेळी अँजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडीमल खेळपट्टीवर होते. पहिल्या तीन चेंडूत निजात नसूने एक धाव खर्च केली होती. पण षटकातील चौथा चेंडू टाकण्याधी खेळ थांबवावा लागला.

श्रीलंकेत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अशा प्रकारे व्यत्येय येण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधी काही वेळा लाईव्ह सामन्यात मैदानात साप आल्याने खेळ थांबवला गेला होता. तर शनिवारी (3 फेब्रुवारी) सीमारेषेच्या आतमध्ये घोरपट आली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, अफगाणिस्तान संघ या एकमात्र कसोटी सामन्यासह श्रीलंका दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी वनडे, तर 17 फेब्रुवारी रोजी टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. (Earlier snakes and now a monitor lizard)

महत्वाच्या बातम्या – 
जसप्रीत बुमराहचा नाद यॉर्कर! स्टंप्स हवेत उडाल्यानंतर ओली पोप भलताच नाराज, पाहा VIDEO
यशस्वी जयस्वाल सोडता भारताचे सर्व फलंदाज फ्लॉप, अँडरसन पुन्हा फॉर्मात, शनिवारी पहिल्या सत्रात भारत सर्वबाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---