युएई येथे होणाऱ्या एशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि हॉंगकॉंग हे एकाच गटात आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानने हाँग काँग विरुद्ध पहिला विजय मिळवत पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.
असे असले तरी भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना आज (19 सप्टेंबर) होणार आहे.
बहुप्रतिक्षित भारत -पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यातच पाकिस्तानचे विश्वचषक विजेते माजी कर्णधार आणि नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान सामन्याला उपस्थितीत राहणार असल्याने चाहत्यांमध्ये आणि खेळाडूंमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.
पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू तसेच त्यांचे नेते इम्रान खानने आपल्या देशासाठी 88 कसोटी आणि 175 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्यांनी 37.69 च्या सरासरीने 3807 धावा आणि वनडेच 33.41 च्या सरासरीने 3,709 धावा केल्या आहेत.
तसेच 544 आंतरराष्ट्रीय विकेट देखील घेतल्या आहेत.1992 साली आँस्ट्रेलियात झालेली विश्वचषक स्पर्धा पाकिस्तानने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती.
2017 चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना झाला होता. त्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप ५: शिखर धवनने दमदार शतक करत केले हे खास विक्रम
–टॉप ५: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान या विक्रमांकडे असणार लक्ष