---Advertisement---

१४१ वर्षांत क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली गोष्ट काल घडली

On: बुधवार, नोव्हेंबर 14, 2018 12:36 PM
---Advertisement---

ढाका | बांगलादेशविरुद्ध झिंब्बाब्वे दुसरा कसोटी सामना सध्या सुरु आहे. यात बांगलादेशचा यष्टीरक्षक मुशफिकुर रहिमने द्विशतकी खेळी केली.

त्याने बांगलादेशच्या पहिल्या डावात ४२१ चेंडूत नाबाद २१९ धावा केल्या. यात १८ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता.

यामुळे त्याच्या नावावर क्रिकेटमधील एक खास विक्रम झाला आहे. कसोटी कारकिर्दीत दोन द्विशतक करणारा तो जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.  कसोटी क्रिकेटला १४१ वर्ष पुर्ण झाली असून या प्रकारात आजपर्यंत मुशफिकुर रहिम सोडून कोणत्याही यष्टीरक्षकाला २ द्विशतकं करता आलेली नाही.

२७३ खेळाडूंनी आजपर्यंत कसोटीत यष्टीरक्षक म्हणुन भाग घेतला आहे. यातील केवळ ८ खेळाडूंना द्विशतक करता आलेली आहेत. या ८ पैकी केवळ रहिमने द्विशतक दोनचा करण्याचा अनोखा पराक्रम केला आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

तब्बल १९९ वन-डे खेळलेला खेळाडू होणार खासदार, कारकिर्द सुरु असताना राजकारणी होणारा पहिला क्रिकेटर

बापरे! या महत्त्वाच्या मालिकेसाठी रोहित टीम इंडियात नाही

फक्त या देशाचे क्रिकेटर खेळणार संपुर्ण आयपीएल २०१९

राॅस द बाॅस- ३४ वर्षीय राॅस टेलरचा क्रिकेटमध्ये कहर कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment