---Advertisement---

IND vs ENG: शुबमन गिलची शानदार खेळी! कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला कर्णधार

On: रविवार, जुलै 27, 2025 6:02 PM
---Advertisement---

मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) आपल्या कसोटी कारकिर्दीतील 9 वे आणि एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील 4 शतक झळकावले. त्याने हे शतक 228 चेंडूंमध्ये पूर्ण केलं. यासह गिल कर्णधार म्हणून पदार्पणाच्या कसोटी मालिकेत 4 शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे, तसेच परदेशातल्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतक करणारा भारतीय कर्णधारही बनला आहे.

भारतीय संघाची एकूण धावसंख्या आता 200 धावांच्या पुढे गेली आहे. मात्र, पाचव्या दिवशी केएल राहुलचं (KL Rahul) शतक थोडक्यात हुकलं. तो 90 धावांवर खेळत असताना बेन स्टोक्सने त्याला बाद केलं. गिल आणि राहुल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी झाली.

मॅचच्या शेवटच्या दिवशी पावसाची शक्यता आहे. जर पावसामुळे खेळ थांबला, तर भारतासाठी फायदेशीर ठरेल. भारतीय संघाची हीच इच्छा आहे की, उर्वरित 90 षटकं पूर्ण खेळत राहावं आणि सामना ड्रॉ करून मैदानातून नाबाद परतावं. दुसरीकडे इंग्लंडचं लक्ष्य भारतीय संघाला लवकरात लवकर बाद करून सामना जिंकण्याचं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---