---Advertisement---

तब्बल २५ वर्षानंतर आमीर सोहेलचा व्यंकटेश प्रसादबरोबर झालेल्या ‘त्या’ चकमकीबद्दल मोठा खुलासा

---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानावर भिडतात त्यावेळी काहीतरी ऐतिहासिक नक्कीच घडत असते. त्यातही मंच जर विश्वचषकाचा असेल तर बात काही औरच. १९९२ विश्वचषकात किरण मोरे यांच्यासमोर जावेद मियादाद यांनी मारलेल्या माकडउड्या प्रेक्षक आजही विसरले नाहीत. त्यानंतर, १९९६ क्रिकेट विश्वचषकात देखील आमीर सोहेल व व्यंकटेश प्रसाद यांच्या दरम्यान घडलेली घटनादेखील विसरणे अशक्य आहे. तेव्हापासून आजपर्यंत नेहमीच चर्चेत असणाऱ्या या घटनेविषयी आता स्वतः आमीर सोहेल यांनी मोठा खुलासा केला आहे.

आमीर यांचा खुलासा
बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर घडलेल्या आमीर सोहेल व व्यंकटेश प्रसाद यांच्यातील वाद्याविषयी आता स्वतः सोहेल यांनी २५ वर्षानंतर भाष्य केले आहे.

एका मुलाखतीत बोलताना सोहेल म्हणाले, “त्यावेळी माझ्यात आणि व्यंकटेशमध्ये कसल्याही प्रकारचा वाद झाला नाही की बाचाबाची झाली नाही. लोकांनी खूप मोठा गैरसमज करून घेतला. जावेद भाईंनी मला सांगितले होते की, गोलंदाज ज्यावेळी दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी काय करायचे. सईद अन्वर बाद झाल्यानंतर धावगती थोडी मंदावली होती. त्यामुळे मी व्यंकटेशला उकसण्याचा प्रयत्न करत होतो. त्याने चांगले टप्प्यावर गोलंदाजी करू नये इतकीच आमची इच्छा होती. मी बाद झालो तो चेंडू आखूड टप्प्याचा असेल अशी मला आशा होती. मात्र, तसे झाले नाही.”

https://twitter.com/BCCI/status/1158246800014245888

काय होती घटना
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर १९९६ च्या विश्वचषकातील साखळी सामना खेळला गेला. धावांचा पाठलाग करताना आमीर सोहेल उत्तम फलंदाजी करत होता. त्यावेळी व्यंकटेश प्रसादच्या गोलंदाजीवर त्याने चौकार वसूल केला व प्रसादला बॅट दाखवून सीमारेषाकडे पाहण्यास सांगितले. प्रसादने पुढच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवत त्याला योग्य प्रत्युत्तर दिले. भारतीय संघाने हा सामना जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा निश्चित केली होती. मात्र, आजही हा सामना सोहेल व प्रसाद यांच्यातील वादासाठी ओळखला जातो.

महत्त्वाच्या बातम्या –

टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी वासीम जाफरने सांगितले, अंपायर म्हणून हवते धर्मसेना; कारणही आहे विशेष

Video: भारतात असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूला अनुभव सांगताना कोसळले रडू

क्लार्क म्हणतो, ‘हा’ भारतीय जगातील सर्वोत्तम फलंदाज; तर अख्तर सर्वात वेगवान गोलंदाज 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---