बांगलादेश संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. झिम्बब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी (७ ऑगस्ट) खेळला गेला. सामन्यात यजमान झिम्बब्वेने बांगलादेशला ५ विकेट्सने पराभूत केले आणि मालिका देखील नावावर केली. सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर बांगलादेश संघाला आयसीसीकडून अजून एक मोठा धक्का मिळाला.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघाला षटकांची गती राखता आली नाही. सामन्याला ठरलेल्या वेळेपेक्षा उशीर झाल्यामुळे आयसीसीने बांगलादेश संघाला जबाबदार ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या मॅच फिसच्या ४० टक्के रक्कम कापली गेली आहे. आयसीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. आयसीसीच्या एलीट पॅनलचे मॅच रेफरी अँडी पाईक्रॉफ्ट यांनी हा निर्णय घेतला. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आयसीसीच्या एलीट पॅनलचे रेफरी अँडी पाईक्राफ्ट यांनी तमीम इकबालला वेळेपेक्षा दोन पीवीआर मागे राहण्यासाठी दोषी ठरवले आहे.
ठरलेल्या वेळेत षटकांचा कोटा पूर्ण केला नसल्यामुळे आयसीसीने नियमांनुसार बांगलादेश संघावर ही कारवाई केली आहे. नियमांप्रमाणे एका षटकासाठी खेळांडूंची २० टक्के मॅच फिस कापली जाते. याच हिशोबाने पाहिले, तर बांगलादेश संघ २ षटके मागे पडला होता आणि त्यांच्या खेळाडूंची ४० टक्के मॅच फिस कापली गेली आहे.
बांगलादेशचा कर्णधार तमीम इकबाल (Tamim Iqbal) याने स्वतःची चूक मान्य देखील केली आहे. सामन्यातील मैदानी पचं पोर्स्टर मुटिजवा आणि लैंग्टन रुसेरे, तसेच तिसरे पंच इकोन इकोनो चाबी आणि चौथे पंच क्रिस्टोफर फिरी यांनी हे आरोप केले होते, ज्यामुळे संघावर कारवाई केली गेली.
दरम्यान, बांगलादेश संघाच्या या झिम्बाब्वे दौऱ्याचा विचार केला, तर परिस्थिती यावेळी जयमान संघासाठी अनुकूल दिसत आहे. उभय संघातील टी-२० मालिका झिम्बाब्वेने जिंकली आणि इतिहास घडवला. अशात आता तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत देखील बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना झिम्बाब्वेने नावावर केला आणि मालिका देखील खिशात घातली आहे. आता तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी (१० ऑगस्ट) खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रुडी कर्स्टनच्या मृत्यूनंतर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं दु:ख, ट्वीट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा
एशिया कपच्या बाहेर भारताच्या ‘या’ सलामीवीराची टी२० लीगमध्ये विस्फोटक खेळी
क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी! ३३२ सामने पाहिलेला दिग्गज काळाच्या पडद्याआड