भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि निर्णायक सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) रायपूरमध्ये आयोजित केला गेला आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 2-1 अशा आघाडीवर असणाऱ्या बारताकडे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरला आहे.
भारतीय संघत या सामन्यासाठी चार महत्वपूर्ण बदक पाहायला मिळाला. तिलक वर्मा याला विश्रांती दिली गेली असून श्रेयस अय्यर याला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले. त्याव्यतिरिक्त जितेश शर्मा, दीपक चाहर आणि मुकेश कुमार यांनी ईशान किशन, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान बनवले. (in 4th T20i Australia have won the toss and they’ve decided to bowl first.)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया – जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
विजय हजारे ट्रॉफीत गोलंदाजांवर जोरात बसरला कार्तिक! ठोकले 13 चौकार आणि 4 जबरदस्त षटकार
‘इरफानला 5 वर्षे केलं डेट, गंभीरही सारखाच करायचा…’, शमीला प्रपोज करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा