हार्दिक पंड्या मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. दरम्यानच्या काळात त्याने भारतीय संघासाठी काही सामन्यांमध्ये मॅच विनरची भूमिकाही पार पाडली. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याने भारतीय संघातील स्थान पुन्हा पक्के केले आणि सध्या तो उपकर्णधाराच्या रूपात खेळत आहे. असे असले तरी, मागच्या काही दिवसांमध्ये पंड्यावर टीका देखील होत आहे. गुरुवारी (12 जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातील त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे पंड्यावर होणाऱ्या टीकांनी अधिकच जोर धरला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा दुसरा वनडे सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल दिसली. परिणामी प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंका संघ अवघ्या 215 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकन संघ फलंदाजी करत असताना भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (hardik Pandya) याच्या तोंडून अपशब्द निघाल्याचे समोर येत आहे. स्टंप माईकमध्ये हा आवाज कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओत हार्दिक मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उभा असताना डगआउटमधील सहकारी खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील सदस्यासाठी हे अपशब्द वापरताना दिसत आहे. मागच्या षटकात पाणी मागितले असताना अजून पाणी आणले नाही म्हणून हार्दिकला संयम सुटल्याचे व्हिडिओतून समजू शकते. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. चाहते आणि क्रिकेट प्रेमी हार्दिकच्या मैदानातील या वर्तनावर नाराजी व्यक्त करत आहेत.
Once a chhapri will always be a chhapri!! #HardikPandya pic.twitter.com/18z0iGidIV
— Amit. (@iOnlyAJ) January 12, 2023
https://twitter.com/roshan_singh18/status/1613508502823260162?s=20&t=txiV8l-YKvUFfaFwgAfBwQ
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात देखील त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी विराट कोहली धाव घेण्यासाठी अर्ध्या क्रीजवर आला होता. मात्र, हार्दिकने त्याला माघारी पाठवले. यावेळी सुदैवाने विराट धावबाद झाला नाही आणि नंतर त्याने शतक ठोकले. चाहत्यांनी हार्दिकचे हे वर्तन देखील चांगलेच खटकल्याचे पाहायला मिळाले होते. अनेकांनी ‘उपकर्णधार बनताच हार्दिक त्याचे रंग दाखवू लागला आहे’, असे म्हटले. अशात आता उपकर्णधाराच्या रूपात हार्दिक पंड्या आगामी सामन्यांमध्ये कसा खेळतो, यासह त्याचे मैदानातील वर्तन आणि सहकारी खेळाडूंसोबतची वागणूक, यावर देखील सर्वांचे लक्ष असेल. (In a live match, Hardik Pandya used abusive words for a teammate)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उपकर्णधार बनताच हार्दिकचे बदलले तेवर! दुसरी धाव असूनही पळण्यास विराटला दिला नकार, पुढे….
हॉकी विश्वचषक उंचावल्यास भारतीय खेळाडू होणार करोडपती! ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले बक्षिस