---Advertisement---

टीम इंडियात सामील होण्याआधी केएल राहुलची बहारिनच्या खेळाडूच्या लग्नात धमाल, Photo होतायेत व्हायरल

On: गुरूवार, जून 2, 2022 12:27 PM
KL Rahul
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम संपला आहे. तर घरच्या मैदानावर होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेला अजून एक आठवडा शिल्लक आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ९ जूनला दिल्ली येथे खेळला जाणार आहे. या टी२० मालिकेसाठी केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे.

पण, भारतीय संघाशी जोडण्याआधी तो मित्र डेविड कीलन मथियास याच्या लग्नात पोहोचला. या लग्नाचे फोटो त्याने ‘भाई की शादी’ असे कॅप्शन देत सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. मथियासच्या लग्नात त्याने कूर्ता-पायजामा असा पोशाख घातला होता. राहुलने या लग्नाच्या काही विधीमध्येही सहभाग घेतला होता. त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मथियासची प्रेमिका कल्याणी देसाई ही पण दिसते.

https://twitter.com/klrahul/status/1532051740308406273?s=20&t=ehJlQrRBV6cIRgkNse14Ng

मथियास याचा जन्म देखिल कर्नाटकमध्ये झाला आहे. तो कर्नाटकच्या पंधरा वर्षाखालील क्रिकेट संघाकडून खेळला आहे. तसेच तो कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन-इलेवनचा सदस्यही होता. त्याने २०१५च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करत प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. २०१९च्या रणजी स्पर्धेतही तो खेळला होता.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये बहरिन संघाकडून खेळणाऱ्या ३१ वर्षीय मथियासने यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जर्मनी विरुद्ध पदार्पण केले आहे. त्याने जर्मनी विरुद्ध टी२० क्वालिफायरचा सामना खेळला होता. टी२०च्या ४ सामन्यांत त्याने ४० सरासरीने १२० धावा केल्या आहेत.

पंधराव्या आयपीएल हंगामात राहुलने लखनऊ सुपर जायंट्स या नवीन संघाचे नेतृत्व केले आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिके विरुद्ध नेतृत्व करणारा राहुल भारतीय संघाचा टी२० क्रिकेटमधील आठवा कर्णधार असेल. त्याने ५६ टी२० सामने खेळताना ४०.६९च्या सरासरीने १८३१ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचाही समावेश आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

धोनीला टीम इंडियात खेळण्याची संधी कशी मिळाली? स्वत: माहीनेच केलाय खुलासा

दीपक चाहर चढला बोहल्यावर, लाईव्ह सामन्यात मागणी घातलेल्या प्रेयसीबरोबर थाटला संसार, Photo व्हायरल

हुश्श! गांगुली सोडणार नाही अध्यक्षपद, ट्वीटमागे होतं ‘हे’ कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---