देवधर ट्रॉफी 2023चा चौथा सामना नॉर्थ झोन विरुद्ध सेंट्रल झोन असा खेळला जात आहे. मागच्या तीन वर्षात चाहत्यांना देशांतर्गत क्रिकेटमधील या वनडे स्पर्धेचा आनंद घेता आला नव्हता. यावर्षी बीसीसीआयने ही स्पर्धा पुन्हा सुरू केली असून बुधवारी (26 जुलै) प्रभसिमरन सिंग याने जबरदस्त खेळी करत हंगामातील पहिले शतक ठोकले.
नॉर्थ झोन (North Zone) संघाच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने 107 चेंडूत 121 धावांची खेळी केली. यात 13 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 113.08 होती. फिरकीपटू कर्ण शर्मा (Karn Sharma) याच्या चेंडूवर त्याने यष्टीरक्षक उपेंद्र यादव (Upendra Yadav) याच्या हातात विकेट मगावली. नॉर्थ झोनच्या डावातील 34व्या षटकात प्रभसिमनर सिंग (Prabhsimran Singh) याने विकेट गमावली. त्याच्या संघाची धावसंख्या 3 बाद 200 अशी झाली. प्रभसिमरनने 92 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकाच्या जोरावर नॉर्थ झोनची धावसंख्या 50 षटकांमध्ये 8 बाद 307 पर्यंत पोहोचली.
सेंट्रल झोन (Central Zone) संघासाठी यश ठाकूर आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या. शिवम मावी आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
WICKET! Over: 33.4 Prabhsimran Singh 121(107) ct Upendra Yadav b Karn Sharma, North Zone 200/3 #NZvCZ #DeodharTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) July 26, 2023
प्रभसिमन सिंगने इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामही चांगलाच गाजवला. पंजाब किंग्जसाठी खेळताना त्याने या आयपीएल हंगामात 358 धावांचे योगदान दिले होते. यात एका दमदार शतकाचाही समावेश होता. दिल्ली कॅफिटल्सविरुद्धच्या एका सामन्यात त्याने 65 चेंडूत 103 धावांची खेळी होती आणि आयपीएलमध्ये शतक करणारा सहावा अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरला होता. यापूर्वी अशी कामगिरी मनीश पांडे, पॉल एल्थाटी, देवदत्त पडिक्कल , रजत पाटीदार आणि यशस्वी जयसवाल यांनी अशी कामगिरी केली होती. (In Deodhar Trophy 2023, Prabhsimner Singh scored a century for North Zone team against Central Zone)
महत्वाच्या बातम्या –
युवराजच्या आईकडे 40 लाखांच्या खंडणीची मागणी! युवतीला पोलिसांकडून अटक, वाचा सविस्तर
नव्या वर्षात इंग्लंड दाखवणार भारतात बॅझबॉल! खेळणार पाच सामन्यांची टेस्ट सिरीज