भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे कुटुंबीय सातत्याने चर्चेत असते. आता युवराजच्या कुटुंबातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून, एका युवतीने त्याच्या आईला तब्बल 40 लाखांची खंडणी मागितल्याची गंभीर घटना घडली. संबंधित युवतीला अटक करण्यात आली असून, खंडणी मागितल्याची युवतीने कबुली दिली आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार, युवराज सिंग याचा भाऊ जोरावर हा मागील काही वर्षांपासून नैराश्याचा सामना करत आहे. त्याचीच काळजी घेण्यासाठी मागील वर्षी डिंपी कौशिक हिला केअर टेकर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, कामावर येऊ लागल्यानंतर काही दिवसातच डिंपी ही जोरावर याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका आपल्याला आल्याचे युवराजची आई शबनम यांनी म्हटले. यानंतर तिला कामावरून काढून टाकण्यात आले.
शबनम यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, डिंपी आपल्याला सातत्याने फोन व व्हाट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधून 40 लाख रुपये देण्याची मागणी करत होती. तसे न केल्यास कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत होती. चाळीस लाख रुपयाची व्यवस्था करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर पाच लाख रुपये ऍडव्हान्स देण्याचे ठरलेले. हे पैसे देण्यासाठी ज्यावेळी शबनम या डिंपीकडे पोहोचल्या त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत डिंपी हिला ताब्यात घेतले.
शबनम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डिंपी हिच्यावर कलम 384 अंतर्गत फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पोलीस पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
(Women Held To Be Extort Money From Yuvraj Singh Singh Mother Shabnam)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार? बीसीसीआयकडून झाली मोठी गफलत
नव्या वर्षात इंग्लंड दाखवणार भारतात बॅझबॉल! खेळणार पाच सामन्यांची टेस्ट सिरीज