भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाईल. भारत प्रथमच स्वतंत्र्यरित्या ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. विश्वचषकासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद व बीसीसीआय स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये बदल करू शकते. यामध्ये सर्वात प्रतिष्ठेच्या मानला जाणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याचाही समावेश आहे.
आयसीसीने मागील महिन्यातच विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विश्वचषकाला 5 ऑक्टोबर रोजी सुरुवात होऊन 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायवोल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळण्याचे निश्चित झाले होते. मात्र, आयसीसीला आपला हा निर्णय बदलावा लागू शकतो.
भारतातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असलेला नवरात्र उत्सव हा 15 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. नवरात्र उत्सव गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्र उत्सव हा प्रामुख्याने रस्त्यांवर साजरा केला जात असल्याने, 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता एक लाखांपेक्षा जास्त असून, देश-विदेशातील लोक हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये येतील. या सर्व पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीसीसीआय हा सामना अन्य दिवशी खेळवण्याच्या पर्यायाची चाचपणी करत आहे.
बीसीसीआय 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याऐवजी भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन करू शकते. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना 15 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथील एकाना स्टेडियमवर होऊ शकतो. तत्पूर्वी, भारत आणि पाकिस्तान वनडे आशिया चषकात तीन वेळा आमने-सामने येऊ शकतात.
(India vs Pakistan match in World Cup is likely to be rescheduled due to the first day of Navaratri)
महत्वाच्या बातम्या –
“रोहित-विराटची शतके काय कामाची?”, गावसकरांनी निवडसमितीला विचारले धारदार प्रश्न
नव्या हंगामासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर! मुंबई-पुण्याला नाही मिळाले यजमानपद