फिफा विश्वचषकाची (FIFA World Cup) 22वी स्पर्धा कतारमध्ये पार पडली. रविवारी (18 डिसेंबर) झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला आणि तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. या स्पर्धेनंतर जागतिक फुटबॉल संघटनेने अर्थातच फिफाने संघांची क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये पहिल्या स्थानावर सध्या कोणाच्याही ध्यानीमनी नसलेला संघ विराजमान आहे.
फिफाने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीनुसार, ब्राझील पहिल्या स्थानावर आहे. ब्राझीलने हे स्थान यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून काबीज केले आहे. त्यांच्याआधी बेल्जियम अव्वल होता. 22व्या फिफा विश्वचषकात ब्राझील उपांत्यपूर्व फेरीतूनच बाहेर पडला, तर अंतिम सामना जिंकूनसुद्धा अर्जेंटिना ब्राझीलला मागे टाकण्यात अपयशी ठरली. अर्जेंटिना या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.
या स्पर्धेत ब्राझीलने साखळी फेरी आणि उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने मिळून तीन सामने जिंकले, तर कॅमरूनविरुद्ध त्यांना पराभूत व्हावे लागले. ब्राझीलला उपांत्यपूर्व सामन्यात क्रोएशियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत व्हावे लागल्याने ते स्पर्धेबाहेर पडले.
दुसरकडे अर्जेंटिनाने मागील वर्षी कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली आणि आता विश्वचषक, तरीसुद्धा त्यांना पहिले स्थान पटकावता आले नाही. या स्पर्धेत त्यांनी सौदी अरेबियाविरुद्धचा सामना गमावून बाकी चार सामने जिंकले, त्यातील दोन सामने पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकले. त्याचबरोबर फ्रांसविरुद्धचा अंतिम सामना शूटआऊटमध्ये गेल्याने अर्जेंटिनाचे काही गूण कमी झाले. क्रमवारीत 90 मिनिटांच्या सामन्यात विजय मिळवल्याच्या तुलनेत शूटआऊटमध्ये संघाला कमी गूण मिळतात. जर अर्जेटिनाने फ्रांसविरुद्धचा सामना 120 मिनिटांमध्ये (30 मिनिटे अतिरिक्त वेळ) जिंकला असता, तर अर्जेंटिना पहिल्या स्थानावर पोहोचली असती.
या क्रमवारीत 2022चा उपविजेता फ्रांस तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे बेल्जियम चौथ्या स्थानी घसरला. इंग्लंड पाचव्या स्थानावर कायम आहे. नेदरलॅंड सहाव्या स्थानावर तर या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावणारा क्रोएशिया सातव्या स्थानावर आहे. विश्वचषकात खेळण्याची संधी थोडक्यात गमावणारा इटली आठव्या, तर पोर्तुगल नवव्या स्थानावर आहे. दहाव्या स्थानावर स्पेन आहे. FIFA Rankings Brazil on Top & Argentina on Second Spot, FIFA World Cup 2022
नव्या फिफा क्रमवारीतील पहिले 20 संघ (2022च्या विश्वचषकानंतर)-
1. ब्राझील
2. अर्जेंटिना
3. फ्रांस
4. बेल्जियम
5. इंग्लंड
6. नेदरलँड
7. क्रोएशिया
8. इटली
9. पोर्तुगाल
10. स्पेन
11. मोरोक्को
12. स्वित्झर्लंड
13. यूएसए
14. जर्मनी
15. मेक्सिको
16. उरुग्वे
17. कोलंबिया
18. डेन्मार्क
19. सेनेगल
20. जपान
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागील 74 वर्षांपासून अबाधित आहे कसोटीमधील ‘हा’ महाविक्रम; वनडे, टी20 पेक्षाही जास्त रोमांचक झालेला सामना
मैदानाबाहेरही मेस्सीचा बलाढ्य विक्रम! रोनाल्डोलाही करता नाही आली ‘अशी’ कामगिरी