Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मागील 74 वर्षांपासून अबाधित आहे कसोटीमधील ‘हा’ महाविक्रम; वनडे, टी20 पेक्षाही जास्त रोमांचक झालेला सामना

आजपासून बरोबर 74 वर्षांपूर्वी इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या चेंडूवर कसोटी सामना जिंकला होता

December 20, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Dennis-Compton

Photo Courtesy: Twitter/@ICC


कसोटी क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात जुना प्रकार आहे. 5 दिवस चालणाऱ्या या कसोटी सामन्यांचा निकाल सहसा चौथ्या किंवा पाचव्या दिवशी लागत असतो. परंतु या स्वरुपात अगदी शेवटच्या चेंडूवर कोणत्या संघाने सामना जिंकल्याचे खूपच क्वचित पाहायला मिळते. मात्र आजपासून बरोबर 74 वर्षांपूर्वी अर्थातच 1948मध्ये (On This Day In 1948) एक कसोटी सामना खेळला गेला होता, ज्याचा निकाल अखेरच्या चेंडूवर (Result On Last Ball) लागला होता. या कसोटी सामन्याला वनडे आणि टी20 सामन्यांसोबतही जोडले जाऊ शकते, कारण या सामन्यात मर्यादित षटकांच्या सामन्यांइतकाच रोमांच पाहायला मिळाला होता.

विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात हा एकमेव कसोटी सामना होता, ज्यात जय-पराजयाचा निर्णय अखेरच्या चेंडूवर लागला होता. हा सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात (England v South Africa) वर्ष 1948मध्ये डर्बन येथे खेळला गेला होता. या सामन्याचा निकाल 20 डिसेंबर 1948 रोजी लागला होता.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि पहिल्या डावात त्यांना फक्त 161 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडकडून लेन हटन आणि डॅनिस कॉम्पनने अर्धशतकी खेळी करत संघाला 253 धावांपर्यंत पोहोचवले. परिणामी इंग्लंडने पहिल्या डावात 92 धावांची आघाडी घेतली होती. पुढे दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेचा संघ फेल झाला आणि त्यांनी फक्त 219 धावा केल्या.

आता इंग्लंडला शेवटच्या डावात विजयासाठी 128 धावांचे आव्हान मिळाले होते. इंग्लंडसारख्या संघासाठी हे आव्हान तितके मोठे नव्हते, परंतु या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना घाम फुटला होता. इंग्लंडने शेवटच्या डावादरम्यान एकवेळ 116 धावांवर 8 विकेट्स गमावल्या होत्या. इंग्लंडला विजयासाठी फक्त 12 धावांची गरज होती. यावेळी इंग्लंडकडून ऍलेक बेडसर आणि केलिफ ग्लॅडविन हे गोलंदाज फलंदाजीसाठी मैदानावर आले होते.

त्यावेळी एक षटक 8 चेंडूंचे असायचे. या दोघांनी शेवटून दुसऱ्या षटकात 4 धावा जमवल्या होत्या. आता शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 8 धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेकडून लिंडसे टकेट हे षटक टाकण्यासाठी आले होते. या षटकाच्या सहाव्या चेंडूपर्यंत इंग्लंडच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या 128 धावांच्या आव्हानाची बरोबरी केली होती. पुढील सातव्या चेंडूवर ग्लॅडविनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू त्यांच्या बॅटला न लागल्याने या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही.

आता शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला विजयासाठी एका धावेची आवश्यकता होती. टकेटच्या शेवटच्या चेंडूवर ग्लॅडविनने पुन्हा एकदा बॅट जोराने फिरवली. पण यावेळी चेंडू बॅटला न लागता त्यांच्या मांडीला जाऊन धडकला. चेंडूचा बॅटला स्पर्श झालेला नसूनही ग्लॅडविन धाव घेण्यासाठी पळाला आणि क्षेत्ररक्षकांनी चेंडू पकडण्याच्या आधी एक धावही पूर्ण केली. अशाप्रकारे शेवटच्या चेंडूवर 2 विकेट्स राखून इंग्लंडने तो सामना जिंकला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदानाबाहेरही मेस्सीचा बलाढ्य विक्रम! रोनाल्डोलाही करता नाही आली ‘अशी’ कामगिरी
लईच चोपलयं! फक्त 13 वर्षांच्या पोराने पाडला 38 षटकार अन् 30 चौकारांचा पाऊस


Next Post
Brazil Football Team

FIFA क्रमवारीनुसार ब्राझील पहिल्या स्थानावर, तर चॅम्पियन अर्जेंटिना...

Photo Courtesy: Twitter/ICC

अर्रर्र, घरच्या मैदानावर पाकिस्तान गारद; करा'चीत' इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

anderson-broad

काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143