Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लईच चोपलयं! फक्त 13 वर्षांच्या पोराने पाडला 38 षटकार अन् 30 चौकारांचा पाऊस

December 19, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


भारतीय क्रिकेट इतिहासात डोकावून पाहिले तर असे अनेक क्रिकेटपटू दिसून येतात, ज्यांनी शालेय क्रिकेटमध्ये मोठी करामत केली होती. क्रिकेटचा विक्रमादित्य सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर, पृथ्वी शॉ व अरमान जाफर ही त्यापैकीच काही नावे आहेत. आता त्याच नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडू शकते. नोएडा येथील 13 वर्षांच्या तन्मय सिंग याने या सर्व दिग्गजांप्रमाणे एक तुफानी खेळी केली आहे.

ग्रेटर नोएडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सोमवारी (19 ऑक्टोबर) देवराज स्पोर्ट्स क्लब आणि रायन इंटरनॅशनल क्रिकेट अकादमी यांच्यात 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या सामन्यात तन्मयने ही अप्रतिम खेळी केली. देवराज स्पोर्ट्स क्लबचा फलंदाज तन्मयने या सामन्यात 401 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत तन्मयने केवळ 132 चेंडूंचा सामना केला आणि 38 षटकार ठोकले. याशिवाय त्याच्या बॅटमधून 30 चौकार आले. त्याने केवळ षटकार-चौकारांसह 346 धावा केल्या. त्याच्यासोबत रुद्र बिधुरीने नाबाद 135 धावांची खेळी केली. या फलंदाजाने आपल्या खेळीत 15 षटकार आणि 5 चौकार लगावले.

भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांनी शालेय वयात शारदाश्रम विद्यालयाकडून खेळताना 646 धावांची भागीदारी केली होती. तसेच सध्या देशांतर्गत क्रिकेट गाजवणारा सर्फराज खान याने हॅरिस शिल्ड स्पर्धेत 439 धावा केल्या होत्या. तर, पृथ्वी शॉ याने या स्पर्धेत तब्बल 546 धावांची खेळी केली होती. मुंबईचा आणखी एक युवा क्रिकेटपटू प्रणव धनावडे याने 1009 धावांची विश्वविक्रमी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले.

(Noida 13 years old kid tanmay Singh hits 38 Sixes and 30 fours)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगजेत्या मेस्सीचा जन्म आसाममधील! काँग्रेस खासदाराच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ
युएईत दिसणार ‘पठाण पॉवर’! नव्या टी20 लीगमध्ये कॅपिटल्ससाठी दाखवणार टशन


Next Post
Kerala Blasters FC

चेन्नईयन एफसीने कमबॅक केले, केरळा ब्लास्टर्सला बरोबरीत रोखले

Photo Courtesy: Twitter/FIFA World Cup

मैदानाबाहेरही मेस्सीचा बलाढ्य विक्रम! रोनाल्डोलाही करता नाही आली 'अशी' कामगिरी

Dennis-Compton

मागील 74 वर्षांपासून अबाधित आहे कसोटीमधील 'हा' महाविक्रम; वनडे, टी20 पेक्षाही जास्त रोमांचक झालेला सामना

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143