लिओनल मेस्सी याने फिफा विश्वचषक 2022 मध्ये आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपल्या खेळाची जादू अशी पसरवली की, अर्जेंटिना जगज्जेता बनला. लिओनल मेस्सी याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने फ्रान्सचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर तसेच जगभरात केवळ मेस्सीच्याच नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता एका भारतीय खासदाराने मेस्सीचा जन्म थेट आसाममधील असल्याचे म्हटले आहे.
अर्जेंटिना संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर जगभरातून त्यांचे अभिनंदन केले जातेय. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार अब्दुल खालिक यांनी देखील ट्विट करत अर्जेंटिना व मेस्सीचे अभिनंदन केले. त्यांनी मेस्सीचे छायाचित्र ट्विट करत लिहिले,
‘अंतःकरणापासून अभिनंदन. तुझा आसामशी असलेल्या नात्याचा आम्हाला अभिमान आहे.’
त्यावर एका ट्विटर वापरकर्त्याने, ‘आसामशी कसला संबंध?’ असा प्रश्न विचारला. त्यावर खालिक यांनी ‘त्याचा जन्म आसाममध्ये झाला आहे.’ असे उत्तर दिले. मात्र, यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले. त्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले. मात्र, तोपर्यंत अनेकांनी या ट्विटचा स्क्रीन शॉट शेअर केला होता.
मेस्सी याचा जन्म अर्जेंटिना येथेच झाला असून त्याने बराचसा काळ स्पेनमधील बार्सिलोना येथे व्यतीत केला. तब्बल सोळा वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमच त्याला विश्वविजेता खेळाडू होण्याचा मान मिळाला. तसेच, या विश्वचषकातील सर्वात खेळाडूचा बहुमान देखील त्याने आपल्या नावे केला. अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षानंतर विश्वचषक उंचावला आहे.
(Messi Born In Assam congress MP Tweeted)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फुटबॉलचा नवा राजकुमार! हॅट्रिक मारत अर्जेंटिनाच अवसान घालवलेला बाजीगर एम्बाप्पे
लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी